ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा

व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघातर्फे तहसीलदार यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

व्हाॅईस ऑफ मिडीयासोबत आपण संलग्न आहात, ही स्वाभिमानाची बाब आहे. आपले संस्थापक अध्यक्ष मा. श्री. संदीप काळे यांच्या वैचारिक मंथनातून निर्माण झालेली ही संघटना आपण सर्व पत्रकार एक आहोत, ही संकल्पना घेऊन वाटचाल करीत आहे. म्हणून लोकशाहीचे प्रहरी असलेल्या पत्रकारांवर कुठेही हल्ला झाला तर त्याविरुद्ध आवाज उठविणे आपले कर्तव्य आहे.

    दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तास चे ब्युरो चीफ श्री. योगेश खरे, साम टीव्ही चे ब्युरो चीफ श्री. अभिजित सोनवणे व पुढारी न्यूज चे ब्युरो चीफ श्री. किरण ताजने यांच्यावर पार्किंगवर कार्यरत गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक, लाथाबुक्के आदींनी भीषण हल्ला केला.

या हल्ल्यात श्री. किरण ताजने गंभीर जखमी होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले ही लोकशाहीला काळिमा फासणारी, चौथ्या स्तंभावर घाला घालणारी गंभीर बाब आहे. पत्रकार समाजातील सत्य घटनांचा आवाज बनतात. अन्याय, भ्रष्टाचार व सामाजिक प्रश्न प्रकाशात आणण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेतात. अशा व्यक्तींवर होणारे हल्ले ही अत्यंत निंदनीय व असह्य बाब आहे.

   याविरोधात सावली तालुक्यातील पत्रकारांनी निषेध नोंदवून कडक कारवाईची मागणी करण्यासाठी मा. तहसीलदार प्रांजली चिरडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी व्हाॅईस ऑफ मिडीयाचे अध्यक्ष प्रा .विजय गायकवाड,उपाध्यक्ष डॉ. शेखर प्यारमवार, कार्याध्यक्ष प्रवीण झोडे, रुपचंद लाटेलवार, प्रसिद्ध प्रमुख सौरव गोहणे, प्रामुख्याने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये