ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

10 जानेवारीला शरद पवार महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांची नॅक बाबत नियोजन सभा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

येथील शरदराव पवार महाविद्यालयांमध्ये येत्या 16 व 17 जानेवारी 2024 ला महाविद्यालयाची गुणवत्ता, सुविधा आणि दर्जा यांचे मूल्यांकन करण्यासाठी बंगलोर येथील नॅक समिती महाविद्यालयात येणार असून ही समिती माजी विद्यार्थ्यासोबत 16 जानेवारी 2024 ला दुपारी 12 वाजता संवाद साधणार आहे. या अनुषंगाने महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची नॅक बाबत होणाऱ्या संवाद सभेचे नियोजन करण्यासाठी दिनांक 10 जानेवारी 2024 ला 11वाजता महाविद्यालयाचे सभागृहामध्ये माजी विद्यार्थी नियोजन सभा आयोजित करण्यात आलेली आहे.

  या नियोजन सभेमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय कुमार सिंह, समन्वयक डॉ.संजय गोरे व माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष प्रा.आशिष देरकर व सचिव सतीश बेतावार माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. नॅक समिती माजी विद्यार्थ्यासोबत महाविद्यालयातील सुविधा गुणवत्ता आणि दर्जा त्याच बरोबर महाविद्यालयाच्या विकासामध्ये माजी विद्यार्थ्यांची भूमिका यावर चर्चा करणार असल्याने या संदर्भात माजी विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी व या समितीसमोर माजी विद्यार्थ्यांनी आपली सकारात्मक भूमिका मांडावी याबाबतचे नियोजन करण्यासाठी दिनांक 10 जानेवारी 2024 ला 11 वाजता महाविद्यालयांमध्ये माजी विद्यार्थ्यांची सभा आयोजित करण्यात आली असून या सभेला महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष प्रा.आशिष दरेकर व समन्वयक डॉ.संजय गोरे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये