ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा संपन्न

जिल्ह्यातील ८० बॉक्सिंग खेळाडूंचा सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर, चंद्रपूर जिल्हा बाॅक्सिंग संघटना व आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 20 वी एक दिवसीय जिल्हास्तर बॉक्सिंग स्पर्धा बाबा आमटे यांच्या आनंदवन वरोरा येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील एकुण ८० बॉक्सिंग खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

स्पर्धा आयोजनास चंद्रपूर जिल्हा बाॅक्सिंग संघटनेच्या वतीने या उपक्रमास एक नवी दिशा प्राप्त झाली स्पर्धेकरिता पंचांनी आपली कामगिरी पार पाडत उत्कृष्टपणे स्पर्धा यशस्वी होण्याकरिता मोलाची भूमिका बजावली. या स्पर्धेकरिता आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा यांनी आपले सहकार्य देऊन खेळाडूंचे मनोबल वाढविले.

स्पर्धेच्या उद्घाटनास लाभलेले चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बी. प्रेमचंद, आंनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे, मा. बंडू देऊळकर, अध्यक्ष, वरोरा बॉक्सिंग संघटना, प्रा. तानाजी बायस्कार प्रा. संगिता आर. बांबोडे, सहसचिव, चंद्रपूर जिल्हा बॉक्सिंग संघटना, पोलीस दलातील राष्ट्रीय खेळाडू प्रीती बोरकर, ३ स्टार पंच वर्षा कोयचाळे, लता इंदुरकर,पंकज शेंडे, शुभम जुगनाके हे प्रामुख्याने उपस्थित होते.

तर बाॅक्सिंग संघटनेचे सचिव श्री डॉ. राकेश तिवारी व विजय डोबाळे राज्य क्रीडा मार्गदर्शक बाॅक्सिंग यांनी विजयी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये