ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणपती मंदिरातील मूर्तीचा चांदीचा मुकुट, अज्ञात चोरट्याने केला लंपास 

गुन्हा दाखल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा चिखली महामार्गावरील तालुक्यातील आळंद फाटा येथे असलेल्या प्रसिद्ध श्री गणपती मंदिरातील चांदीचा मुकुट अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना दिनांक पाच च्या सूर्योदयापूर्वी साडेपाच सहा च्या दरम्यान घडली याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 सविस्तर वृत्त असे की देऊळगाव राजा चिखली रोडवर मेव्हणा राजा जवळ असलेल्या आळंद फाट्यावर श्री स्वामी रामचरणदास महाराज आणि श्री गणपती मंदिर हे तालुक्यातील तसेच परिसरातील श्रद्धास्थान असलेले श्री गणपती मंदिर आहे, येथे दिवसभरात शेकडो भाविक येतात.मंदिरात असलेल्या श्री गणपती मूर्तीचा चांदीचा मुकुट किंमत सात हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना आज दिनांक पाच रोजी सूर्योदयापूर्वी घडली याप्रकरणी फिर्यादी राधाकिसन गोपाळजी खार्डे यांनी फिर्याद दिली याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कलीम देशमुख करीत आहेत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये