Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

सावली तालुक्यातील सिर्शी येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

 वनपरिक्षेत्रांतर्गत सिरसी बीटातील कक्ष क्रमांक १९६ येथे दररोज प्रमाणे आपली गुरे चरायला गेलेल्या गुराखी दिवाकर नथुजी आवळे रा. सिर्सी या व्यक्ती वर अचानकपणे दबा धरून बसलेल्या वाघाने हमला करून जागीच ठार केल्याची घटना आज दुपार दोन वाजता च्या सुमारास घडली जंगल व्याप्त शेतशिवारात गुरे चारत असतांना वाघाने हल्ला करून ठार केले. वरील घटना सावलीचे वनपरीक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांना माहीत होताच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात आली.

यावेळी उपवन परिक्षेत्र अधिकारी राजू कोडापे,बीट वनरक्षक महादेव मुंडे,वनरक्षक सोनेकर,वनरक्षक आखाडे व वन कर्मचारी उपस्थित होते.वरील घटना माहीत होताच परिसरात वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमास बघण्याकरिता एकच गर्दी उमटलेली होती महिनाभरात अनेक घटना तालुक्यात झालेल्या असून सध्या शेतीचे हंगाम सुरू आहे यातच मजुरांना वन्य प्राण्यांपासून बचाव करण्याची वारंवार वन विभागांनी सूचना देऊन सूचनेचे पालन होत नसल्याने अनेक घटना घडत असल्याचेही नाकारता येत नाही वन विभागाने नेहमी सतरता बाळगण्याचे आव्हान जनतेला करीत असून सदर घटनेने आम जनतेत चांगलीच भीतीचे वातावरण पसरलेले असून वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये