Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सर्प दंशाने एका युवा शेतकऱ्याचा मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतूल कोल्हे

भद्रावती तालुक्यातील वाघेडा (से ) गाव परिसर जंगल व्याप्त असल्याने या जंगलात हिंसक प्राणी तसेच विषारी सरपटणारे साप आहे.

यामुळे परिसरातील शेतकरी आपला जीव मुठीत घेऊन पीक वाचविण्या साठी प्रयत्न करतात.

तुरीवर किटकनाशक फवारणी करण्यासाठी राकेश नत्थूजी बोथले वय अंदाजे 36 वर्ष याला दि 11 डिसेंबर 2024 ला दुपारी 1.00 वाजता सर्प दंश झाला ही घटना घरच्यांना माहित होताच त्यांनी राकेशला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय मध्ये दाखल केले.

मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे पाठवुन भरती करण्यात आले. प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. अखेर राकेशचा दि. 13 डिसेंबरच्या मध्यरात्री मृत्यु झाला.

    या शेतकऱ्याच्या जाण्यामुळे घरी असलेल्या पत्नी पपीता राकेश बोथले वय 32 मुलगा ची आयुष राकेश बोथले 13 शिक्षण 7 वी आणि मुलगी आरोही राकेश बोथले 8 वर्ग 2 मध्ये शिकत असून सोबत आई वडील म्हातारी आजी आणि दोन भावंडे अशा परिवार असून या युवा शेतकरी जाण्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

       साप आणि वाघ हे वन्यप्राणी असून शेतकरी यांना नेहमी या प्राण्या सोबत शेती करतांना संपर्कात राहावे लागतात, वन्य प्राणी हिंसक चालणारे तर कधी सरपटणारे प्राणी या दोन्ही प्राण्यामुळे जवळ पास सारखेच शेतकरी शेतमजूर मरण पावल्याच्या घटना घडत आहे त्यामुळे शेतकरी यांना वाघाने मारल्यास 25 लाख शासन अनुदान संबंधिताच्या नातेवाईक यांना देतात तसेच सापामुळे पण शेतकरी यांचा मृत्यू झाल्यास 25 लाख रुपये शासनाने अनुदान नातेवाईक यांना देण्यात यावे. 

 किशोर डुकरे, शेतकरी नेते वरोरा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये