गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोयाबीन व तूर पिकाचे चोरी केलेले बी- बियाने पोलिसांनी केले जप्त

आरोपी, वाहनासहित एकूण ७ लाख २२ हजारावर मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 चांदुर रेल्वे येथे आज दि. 27/06/2023 रोजी चे दुपारी 15.00 वा. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चांदुर रेल्वे शिवाजी नगर येथे राहणारा सागर रतन पवार, वय 32 वर्ष हा टाटा पिकअप वाहन क्र. MH 34 AV 0558 या वाहणाने सोयाबीन व तूर पिकाचे चोरी केलेले बी- बियाने विक्री करिता घेऊन जात आहे. अश्या माहितीवरून सापळा रचून सागर रतन पवार व त्याचा साथीदार राहूल सुम्बर भोसले, वय 24 वर्ष, रा. राजीव गांधी नगर चांदुर, रेल्वे यांना वाहन व चोरीच्या मुद्देमालसह जागीच पकडले, त्या नंतर अधिक माहिती घेऊन सागर पवार ह्याच्या घराशेजारी तसेच त्याच्या गौरखेडा येथील शेतात त्याने उर्वरित बी बियानाचे पोते लपवून ठेवले आहेत अश्या माहिती वरून सदर ठिकाणी रेड केली असता तेथे सुद्धा मोठ्या प्रमाणात बी बियाणे चे पोते मिळून आले, एकूण सोयाबीन व तूर पिकाचे बियाणे ची मोजणी केली असता त्यामध्ये
1) सोयाबीन एकूण 09 क्विंटल 58 किलो सोयाबीन पिकाचे बियाने.
2)तूर एकूण 07 क्विंटल 54 किलो तूर पिकाचे बियाणे. असा बिजवाईचा सोयाबीन व तूर पिकाचे बियाणे एकूण किं. 2,22084/- रु व व चारचाकी पिकअप वाहन किं. 5,00000/- रु. असा एकूण 7,22,084/- रु. चा मुद्देमाल चांदुर रेल्वे पोलिसांनी जप्त केला, याबाबत पोलीस स्टेशन पुलगाव येथे दि. 26/06/2023 रोजी अप. क्र. 542/2023 कलम 380, 457, 461 भादवी अन्वये गुन्हा दाखल असून मुद्देमालाची पडताळणी करून आरोपी, वाहन व मुद्देमाल पुलगाव पोलिसांच्या ताब्यात देण्याची कारवाई सुरु आहे. सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री.अविनाश बारगळ साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. शशिकांत सातव साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सूर्यकांत जगदाळे साहेब, यांच्या मार्गदर्शन खाली सपोनि पंकज दाभाडे, पोउपनि प्रमोद काळे, पोउपनि सुयोग महापूरे, पोहेका शिवाजी घुगे, नापोका प्रवीण मेश्राम, पोका अरविंद गिरी, नापोका योगेश नेवारे, पोका रवि भुताडे, पोका अलीम पटेल, पोका सचिन पाटील सर्व स्टाफ पोस्टे चांदुर रेल्वे यांनी पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये