ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एफ ई एस गर्ल्स महाविद्यालयात ७६ वा स्वातंत्र्य दिन संपन्न

चांदा ब्लास्ट

फिमेल एजुकेशन सोसायटी चंद्रपूर अंतर्गत हायस्कूल व महाविद्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ॲड. विजय मोगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

स्वातंत्र दिनाच्या कार्यक्रमाला ॲड. पुरुषोत्तम सातपुते सचिव, गजानन गावंडे, अध्यक्ष, शाळा समिती, केशवराव शेंडे, प्राचार्या मीनाक्षी ठोंबरे, प्राचार्या संगीता बूटले, माजी मुख्याध्यापिका हंसा गिरडकर, उपमुख्याध्यापक पाकमोड़े, पर्यवेक्षक गुडदे व्यासपीठावर उपस्थित होते.

विद्यार्थिनींनी ध्वजगीत, महाराष्ट्र गौरव गीत सादर केले. ॲड. विजय मोगरे यांनी देशात स्त्रियांचा सन्मान होणे हेच प्रगतीचे द्योतक आहे व आपल्या देशाची प्रगती करण्यासाठी आपण सदैव कटीबद्ध असलो पाहिजे असे उद्गार काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक आनंद वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षक, प्राध्यापक, पालक, माजी विद्यार्थिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये