134 वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पोलीस स्टेशन वर्धा येथे साजरी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक रोजी 14 एप्रिल 2025 रोजी भारतीय राज्यघटना शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब रामजी आंबेडकर यांच्या वाढदिवस संपूर्ण जगात साजरा करण्यात येत असून यानिमित्ताने पोलिस स्टेशन वर्धा शहरचे ठाणेदार पराग पोटे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माला अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित पोलिस स्टेशन वर्धा शहरचे ठाणेदार पराग पोटे पोलिस उपनिरीक्षक उमेश उगले पोलिस उपनिरीक्षक विशाल सवई सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल चव्हाण पोलिस हवालदार शरद धोंगडे पोलिस हवालदार किशोर पाटील महिला पोलिस हवालदार प्रिती ठेपे पोलिस शिपाई महेंद्र डेकाटे महिला पोलिस शिपाई विद्या टेकाम पोलिस हवालदार पंकज भरणे पोलिस शिपाई समीर खोब्रागडे व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पोलिस कर्मचारी व होमगार्ड सैनिक कार्यक्रमाला हजर होते अशा प्रकारे पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली आहे.