ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा नगरपरिषदेच्या बांधकाम निविदा प्रक्रियेत मोठा घोळ!

संगमताने काढलेल्या निविदा रद्द कराव्या; अन्यथा तीव्र आंदोलन करणार! ; रिपाइं नेते महेन्द्र मुनेश्वर यांचा एल्गार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

नगरपरिषद वर्धा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत 12,15, व 19 या प्रभागातील बांधकामाच्या एकूण 33 विविध विकास कामांच्या निविदा मुख्याधिकारी व संबंधित काही ठेकेदार यांच्या सगमताने काढण्यात आल्या.मुख्याधिकारी यांनी आपल्या मर्जीतील ठेकेदारांसाठी निविदा काढण्याचा प्रताप केला असा आरोप रिपाइं (ए) चे विदर्भ प्रदेशाध्यक्ष महेन्द्र मुनेश्वर यांनी केला आहे.

वर्धा न. प. चे मुख्याधिकारी यांनी हेतूपुरस्पर आपल्या पदाचा गैरवापर करत नियमबाह्य अटी शर्ती शुद्धिपत्रकाच्या माध्यमातून निविदेत टाकल्या.१० % पॉकेट मनी चे पुठल पुरविणाऱ्या काही ठेकेदारांना काम मिळऊन देण्यासाठी जिओ टॅग वर मुख्याधिकारी यांनी त्वरित स्वाक्षरी केल्याचे निदर्शनास आले.परंतु सुशिक्षित बेरोजगार कॉन्ट्रॅक्टर जिओ टॅगवर सही घेण्यास मुख्याधिकारी यांच्या दालनात गेले असता त्यांना सही देन्यास याच मुख्याधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली.त्यामुळे बरेच सुशिक्षित बेरोजगार कॉन्ट्रॅक्टर हे नगरपरिषदेतील विकास कामांच्या बांधकामाच्या निविदा भरू शकले नाही.निविदा प्रक्रियेमध्ये फार मोठा घोळ झालेला आहे.

मुख्याधिकारी यांनी काढलेल्या निविदा त्वरित रद्द करण्यात याव्या व त्या निविदा मा.जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मार्गदर्शनात पुन्हा काढण्यात याव्या.

वर्धा नगरपालिकेत काही माजी नगरसेवक हे स्थानिक आमदार यांच्या पुढाकाराने ठेकेदारी करताना दिसून येत आहे,हे नगरसेवक यावेळी पदावरून पदमुक्त असतानाही मनमानी करताना दिसतात.परंतु प्रशासक असलेले मुख्याधिकारी हे गप्प बसले आहेत.

विशेष म्हणजे मुख्याधिकारी यांनी निविदेच्या प्रक्रियेत पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात यावी.असेही *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी मा.अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जर मुख्याधिकारी यांनी निविदा प्रक्रिया रद्द केली नाही तर उग्र आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात नमुद आहे.यावेळी वंचित चे विदर्भ प्रदेश नेते किशोर खैरकार,भीम आर्मी संविधान रक्षक चे युवा नेते आशिष सोनटक्के,निर्माण सोशल फोरमचे अध्यक्ष निरज गुजर,भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष विशाल मानकर आदींनी तीव्र आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये