स्वच्छता, सुधारणा, व सामाजिक न्यायाचे प्रतीक म्हणजेच राष्ट्रसंत कर्मयोगी गाडगेबाबा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
भारतीय बौध्द महासभा व डाँ बाबासाहेब आंबेडकर भवन गडचांदूर द्वारा आयोजित राष्ट्रसंत कर्मयोगी गाडगेबाबा जयंती दिनानिमित्य समाज प्रभोधनाचा कार्यक्रम डाँ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दि 23फेब्रुवारी रोजी सायंकाळी घेण्यात आला, सर्व प्रथम राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जीवनावर सुंदर असे गीत गायन वर्षा निरंजने आणि शिला आशील निरंजने यांनी करून सुरुवात केली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रावण जीवणे, बौध्दचार्य भारतीय बौद्ध महासभा ता, कोरपना होते, तर प्रमुख अतिथी, म्हणून कविकर निरंजने, जेष्ठ मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते, उत्तम पारेकर, बौद्धचार्य भारतीय बौद्ध महासभा ता कोरपना, दिव्यकुमार बोरकर,जिल्हा संघटक वंचित बहुजन आघाडी,राहुल निरंजने, मुख्य आयोजक डाँ बाबासाहेब आंबेडकर भवन गडचांदूर, वामनराव दुबे सेवा निवृत्त शिक्षक, पंचमदास वाघमारे, सुमित्राबाई वाघमारे, उपस्थित होत्या पाहुण्यांनीआपले मनोगत व्यक्त केले दिव्याकुमार बोरकर, वामनराव दुबे, उत्तम पारेकर, यांनी आपले विचार मांडलेत
अध्यक्षीय भाषणात, श्रावण जीवणे सर म्हणाले कि सामाजिक अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजूत्ती, अनिस्ट रूढी परंपरा, दूर करण्यासाठी आयुष्य वेचणारे दिवसा हातात झाडू धरून व रात्री कीर्तनच्या माध्यमातून लोकांच्या मनातील घाण काढण्याचे, खरा धार्मिक व्यक्ती कसा असतो हें राष्टसंत गाडगेबाबा नी दाखवून दिले अंधश्रद्धावर घणाघातकरून स्वच्छता, सुधारणा, व सामाजिक न्यायाचे प्रतीक मनजेच संत गाडगेबाबा होय, असे विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, व सूत्रसंचालन, शिला राहुल निरंजने यांनी केले. आभार प्रदर्शन वर्षाताई निरंजने यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, शिला आशील निरंजने, रत्नमालाबाई वाघमारे, संगीताबाई गावंडे, सविता वागमारे, निळाबाई निरंजने, वनिता रामटेके, संगीता गोरघाटे, छाया मोडक, बेबीनंदा खैरे, सुनीता वाघमारे, प्रज्ञा (छकुली)वनकर सुनीता वाघमारे, राहुल निरंजने आयोजक डाँ बाबासाहेब आंबेडकर भवन इत्यादीनी कार्यक्रम घडवून आणला.