डॉ.हर्षानंद हिरादेवे यांना श्रीगुरुदेव दानशूर पुरस्कार जाहीर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलन सांगडी येथे सन्मानित होणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
स्व. किसनराव नागोराव भेदोडकर स्मृती श्रीगुरुदेव दानशूर पुरस्कार बाखर्डी येथील डॉ.हर्षानंद हिरादेवे यांना जाहीर झाला आहे. डॉ. हर्षानंद हिरादेवे यांचे बाखर्डी हे जन्मगाव असून गडचांदूर येथे ते हर्षमाला क्लिनीक सुरु करुन त्यांनी पत्नी डॉ.मालूताई, मुलगा डॉ. महेश व सून डॉ. प्रतिक्षा यांचे सोबतीने वैद्यकीयसेवा करीत आहे.
त्यांनी बाखर्डी या छोट्या गावातील दुर्लक्षीत स्मशानभूमी दुरुस्त करण्यासाठी व बसस्थानक पासून गावापर्यंत दुतर्फा झाडे लावून त्याचे संगोपन करण्याकरीता दिड लाख रुपयाचा निधी गावात झाडे लावणे व स्मशानभूमी दुरुस्तीकरीता स्थानिक श्रीगुरुदेव सेवा मंडळाला दान म्हणून सुपुर्द केला.
त्यांनी दानस्वरुपात दिलेल्या रक्कमेचा योग्य वापर करुन झाडे लावून त्यांनी दिलेल्या सलाईन बाटलचे माध्यमातून अभिनव पद्धतीने ठिबकाचे माध्यमातून झाडांना पाणी देण्यात येत आहे तसेच गावालगत दुर्लक्षीत असलेली स्मशानभुमी मध्ये कंपाऊंड करुन वेगवेगळे झाड लावण्यात आली आहेत तसेच लोकांना बसण्याकरीता बाकांची सुसज्य व्यवस्था करुन त्याठिकाणी आक्सीजन पार्क,गेट तयार करण्यात आले आहे, बाखर्डी गावातील पहिले नामवंत डॉक्टर म्हणून ते सर्वपरिचीत,प्रख्यात असून त्यांनी गावात जि.प.हायस्कुल सुरु करणे सोबतच शेती,वैद्यकीय व्यवसाय व गावातील सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो.
यापुर्वी त्यांचे मोठेबंधु पुरुषोत्तम हिरादेवे यांना श्रीगुरुदेव कृषीसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तसेच डॉ. हिरादेवे यांना गुरुकुल आश्रम मोझरी कडून सन्मानित करण्यात आले आहे हे विशेष, येत्या 6 व 7 मार्च 2025 रोजी होणाऱ्या सांगडी ता.बेला जि.आदिलाबाद येथील संमेलनात डॉ. हिरादेवे यांना मान्यवरांच्या हस्ते श्रीगुरुदेव दानशूर पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
त्यांचे निवडीबद्दल प्रभाकर देवतळे, ॲड.राजेंद्र जेनेकर, विपिनराव वासाडे,उत्तमजी झाडे, सौ.प्रतिभा देवतळे,ॲड.सारीका जेनेकर, डॉ. स्नेहल वासाडे, लक्ष्मीकांत हिरादेवे,आरव वासाडे, प्रदिप हिरादेवे, राघव हिरादेवे आदींनी त्यांचे मनपुर्वक अभिनंदन केले आहे.