ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकमान्यांचे जिवन हे अनेक देशभक्त क्रांतीकारकांसाठी प्रेरणास्थान – जयंत पिंपळापुरे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी :- स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण आनी परकिय वस्तुना बहिस्कार या चतुःसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक तरुणांना देशभक्तीच्या कार्यामधे सहभागी होण्याची प्रेरणा लोकमान्य टिळकांच्या अथक प्रयत्नामुळेच मिळाली म्हणून लोकमान्य टिळक हे सर्व देशभक्त व क्रांतीकारकांसाठी प्रेरणा स्थान होते. असे विचार टिळक पुण्यतिथी निमित्त जंयत पिंपळापुरे यांनी व्यक्त केले.

स्थानीक लोकमान्य टिळक वाचनालय, ब्रम्हपुरी येथे दिनांक 1 ऑगष्ट 2023 ला रोज मंगळवार लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष वाचनालयाचे सचिव श्री दत्ताजी कात्यायण तर प्रमुख अतिथी वाचनालयाचे अध्यक्ष सतिशजी शिनखेडे होते प्रमुख वक्ता श्री जयंत पिंपळापुरे सामाजीक कार्यकर्ते हे होते. दीप प्रज्वलन टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुण कार्यक्रमाला सुरुवात झाली.

प्रास्ताविक व परीचय सतिशजी शिनखेडे तर उपस्थितांचे आभार वामणराव भुसारी यांनी मानले. कार्यक्रमाचे संचालन ग्रंथपाल राजेश देऊरकर यांनी केले. कार्यक्रमाला वाचनालयाचे कार्यकारी मंडळ,तसेच वाचक तसेच बहुसंख्येने नागरीक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता चंद्रभान पानसे, मनिष नाकतोडे, दिपक नागरीकर यांनी परीश्रम घेतले,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये