ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी बाल आनंद मेळाव्याची गरज – प्रा. विजय आकनुरवार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

–विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आणि त्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी बाल आनंद मेळाव्याची गरज असल्याचे मत महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार यांनी केले ते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानोली खुर्द येथे गणित जत्रा तथा बाल आनंद मेळाव्याच्या उदघाटन कार्यक्रमात उदघाटक म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख संजय त्रिपतिवार तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच अनुसया उदे ,मुख्याध्यापक गोविंद पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश आदे, पोलिस पाटील प्रकाश चटप, शिक्षक राजेश पवार,वनपाल सोयाम,सीता मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी केंद्रप्रमुख संजय त्रिपतिवार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले सर्वप्रथम पाहुण्यांचे स्वागत लेझीम पथकाने करण्यात आले.

   हा मेळावा गावातील मुख्य चौकात भरवण्यात आला. यात शाळा व्यवस्था पण समितीचे सदस्य,ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळीनी सहभाग घेतला गणित जत्रेचा आनंद घेत मुलांनी बनवलेल्या साहीत्याचे कौतुक करून बाजारात लावलेल्या विविध स्टाल वरील वस्तुचा आस्वाद घेतला आणि गणित दिनाचे महत्व समजावून मार्गदर्शन केले.

        या कार्यक्रमाचे संचालन शिक्षक राजेश पवार यांनी केले प्रास्तविक मुख्याध्यापक गोविंद पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन वनपाल सोयाम यांनी केले, सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक,विध्यार्थी,व गावातील नागरीकांनी सहकार्य केले विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळाव्यात मांडलेल्या विविध साहित्याची गावकऱ्यांनी पाहणी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये