ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भरधाव कारची दोन मोटासायकलला धडक

एक ठार,तीन जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

पिंपळगाव चिलामखा रोडवर भरधाव वेगाने व निष्काळीपणामुळे कार चालवत दोन मोटासायकलस्वारला जबर धडक दिली,या अपघातात एक ठार तर तीन व्यक्ती जखमी झालेल्या आहेत, पोलिसांनी कार चालक प्रवीण शिवचंद्र डोंगरे याच्याविरुद्ध गून्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

सविस्तर वृत्त असे की, २९ एप्रिलला सायंकाळीं साडे सात वाजता पिंपळगाव चिलमखा रोडवर तवेरा जीप क्रमांक जी जे ०५, सी एन ०६५७ चा चालक प्रवीण डोंगरे याने भरधाव वेगात व निष्काळजीपणे जीप चालवून मोटारसायकस्वार अमोल अंबादास वाघ, सौ सुनीता अमोल वाघ, कु अक्षरा अमोल वाघ यांच्या मोटासायकल ला धडक देऊन जखमी केले, तसेच पुढे जावून रोडच्या कडेला मोटासायकल क्र एम एच १९ आर ७६८३घेऊन उभा असलेला वैभव नंदकिशोर सवडे रा नांदखेडा याच्या मोटासायकलला ठोस मारल्याने गंभीर जखमी होउन मरण पावला.

शेख मोसीन शेख मस्तान रां. कबाडपुरा, देऊळगाव राजा यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली, त्यानुसार आरोपी कार चालक प्रवीण डोंगरे याच्या विरोधात भा.द.वी. कलम २७९,३०४(अ) ३३८नुसार गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र चव्हाण करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये