ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

होमगार्ड मधील रिक्त असलेल्या एकुन 76 पुरुषांच्या जागासाठी नोंदणीचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हा होमगार्ड मधील रिक्त असलेल्या एकुन 76 पुरुषांच्या जागा भरणे करीता दिनांक 23/08/2024 पासुन सकाळी 7.00 वाजता पोलीस मुख्यालय, वर्धा येथे होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आलेले आहे, या करीता दिनांक 15/08/2024 अखेर पर्यत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असुन होमगार्ड नोंदणीचे ऑनलाईन अर्ज, माहीतीपत्रक नियम व अटी या बाबत विस्तृत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, या जिल्हात महिला करीता जागा रिक्त नसल्याने महिला उमेदवारांनी अर्ज करु नये, उमेदवारांची संख्या जास्त असल्यास त्यांची दिनांकानुसार विभागणी करुन मैदाणी चाचणी पुर्ण केली जाईल, नोंदणी दिनांकास दिनांक 23.08.2024 रोजी सकाळी 7.00 ते 11.00 वाजेपर्यत आवश्यक कागदपत्रासह उपस्थित होणे आवश्यक राहील, दिलेल्या वेळेनंतर उपस्थित होणाऱ्या उमेदवारांचा नोंदणी करीता विचार केला जाणार नाही, नोंदणी दिनांकापर्यत रिक्त जागेचा अनुशेष वाढल्यास, नांव नोंदणी मधुन अनुशेष पुर्ण केला जाईल.

तरी होमगार्ड मध्ये सेवा करु इच्छीत असलेल्या वर्धा जिल्हयातील रहिवासी असलेल्या उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर दिलेली माहीती वाचून समजून घेऊन अचुक नोंदणी करीता अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये