ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बस स्टॉप वर्धा तसेच ऑटोरिक्षा मध्ये बसून प्रवाशांचे पर्स/पॉकेट/पैशाची चोरी करणारी महिलांची टोळी जेलबंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मागील काही दिवसांपासून बस स्टॉप वर्धा येथे चोरीचे प्रमाण वाढले होते, तिथे जिल्हयातील तसेच बाहेरील जिल्हयातील महिला तोंड बांधून बस मध्ये प्रवासी चढत असताना प्रवाशांचे पॉकेट मारणे, हातातील बॅगमधून पैसे काढणे अशा प्रकारच्या घटना वाढल्या होत्या त्यानूसार बस स्टॉप वर्धा येथे गुप्त बातमीदारा द्वारे ट्रॅप लावून चोरी करताना रंगेहात पकडल्या आहेत तसेच त्यांनी मागील काही दिवसांपासून पोस्टे वर्धा शहर हद्दीत विविध गुन्हयात बस स्टॉप परिसर वर्धा, अॅटो रिक्षा मध्ये बसून प्रवांशाचे पैशांची चो-या केल्याची कबुली दिली त्यानूसार पोस्टे वर्धा शहर येथील १) अप क ६२७/२५ कलम ३०३ (२) बीएनएस २) अप क २८६/२५ कलम ३०३(२) बीएनएस ३) अप क ३८२/२५ कलम ३०३(२) बीएनएस च्या गुन्हे उघड झाले असून आरोपींकडून ३०,०००/-रु नगदी रक्कम रिकव्हरी केली असून पूढील तपास सूरु आहे. आरोपी क ०१) सरिता उदयभान हातागळे, वय ३५ वर्ष, रा रामेश्वरी नगर, नागपूर, आरोपी क ०२) चांदणी सागर नाडे, वय २१ वर्ष, रा रामेश्वरी रिंग रोड, रामटेक नगर, नागपूर, आरोपी क ०३) श्रीमती कविता गौतम बनसोड, वय ४९ वर्ष, रा आनंदनगर, पुलफैल, वर्धा असे आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री अनुराग जैन साहेब, मा अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे साहेब, मा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर साहेब तसेच पोलीस स्टेशन वर्धा शहर ठाणेदार मा पराग पोटे साहेब यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथक चे पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोहवा प्रशांत वंजारी, पोहवा शैलेश चाफलेकर, पोहवा नरेंद्र. कांबळे, राजेश राठोड, विजय पंचटिके, पोशी श्रावण पवार, पोशी शिवाजी डोईफोडे सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये