ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे शिक्षकदिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट

गुरुर्बम्हा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः
या प्रार्थनेतून आपण आपल्या गुरुंना ईश्वराइतके महत्त्व देतो. स्वतःजवळ असलेले संपूर्ण ज्ञान वापरुन आपल्याला घडवणारी, आपल्या भविष्यातील आयुष्याला कलाटणी देणारी, शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे आपले शिक्षक होय.

अशा सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चांदा पब्लिक स्कूल येथे 5 सप्टेंबर 2023 रोजी शिक्षकदिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे, प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे तसेच सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

दिपप्रज्वलना समवेत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी पुष्पवर्षाव, औक्षण करून सर्व शिक्षकांना सन्मानित केले.

गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. म्हणूनच शिक्षकदिनाचे औचित्य साधून शिक्षकांच्या सन्मानार्थ इयत्ता 10वी च्या विद्यार्थ्यांनी विविध गीत, नृत्य आणि नाटक चे उत्कृष्ट सादरीकरण केले तसेच 10वी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका घेत अध्यापन कार्य करून शिक्षक दिन उत्साहात साजरा केला.

शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे यांनी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत शिक्षकदिनाचे महत्त्व सांगीतले. शिक्षक हा देशाचा आधारस्तंभ आहे. ते विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचविण्यासाठी मदत करतात. तसेच त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच आपल्या जीवनात शिक्षकांचे स्थान अनन्य साधारण आहे. असे वक्तव्य त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 10वी च्या विद्यार्थीनी तन्वी धात्रक, रूत्वी धार्मीक, खुशी दमके, आर्या नेवलकर, अंशीका भट्टाचार्य, नकीया लक्कडशहा, निधी श्रीपाद तर आधार प्रदर्शन जान्हवी बोबडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम प्रमुख रचना खडसे, फहीम शेख, झेबा जाकीर अंसारी, रेश्मा शेख तसेच सर्व शिक्षकांसमवेत विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये