ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘नृत्यांगन डान्स स्कूल’ नृत्य केंद्राचे गुरुपौर्णिमा व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम

 "नृत्यांगन डान्स स्कूल" ही एक चंद्रपुरातील अद्वितीय नृत्य संस्था

चांदा ब्लास्ट

“नृत्यांगन डान्स स्कूल” नृत्य केंद्राचे गुरुपौर्णिमा व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम जोड देऊळ मंदिर सभागृहात नृत्यमायीरित्या थाटात पार पडले. नृत्य केंद्राच्या संचालिका व गुरु कु. “प्राजक्ता लक्ष्मीकांत उपरकर” यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

या कार्यक्रमाला चंद्रपूरच्या उत्कृष्ट निवेदिका संध्या विरमलवार, प्रसिद्ध नृत्यांगना डॉ. भाग्यलक्ष्मी देशकर, पोदार इंटरनॅशनल स्कूल चे प्राचार्य डॉ. वाल्मीक सोमासे, लेखक श्री आशिष देव, शिशुतज्ञ डॉ. राम भारत यांची प्रमुख उपस्थिती होती.

     केंद्राच्या स्पृहा देव, अन्वी चोरे, अनन्या देशमुख, सान्वी घाटे, तनिष्का चहारे, सौम्या लोखंडे, परी चौधरी या वरिष्ठ विद्यार्थीनी तसेच जवळपास तीस विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुरुच्या मार्गदर्शनखाली आपले नृत्य कौशल्य सादर करून रसिकांची मने जिंकली. या कार्यक्रमात कथक या शास्त्रीय नृत्याचा प्रामुख्याने समावेश केला गेला. त्यात गणेश वंदना, कृष्ण वंदना, शिव स्तुती, तीनताल, झपताल, राम भजन, आदी नृत्ये पढन्त, वादक व गीतकारांसोबत साथसंगत करून प्रस्तुत करण्यात आले. विदयार्थ्यांनींनी गुरूला समर्पित “भेटला विठ्ठल माझा” या नृत्याद्वारे भक्तीरासाचा आनंद रसिकांना दिला. नृत्य केंद्राच्या चमुने देखील काही समकालीन गाणी, लावणी, उपशास्त्रीय नृत्य देखील सादर करून मैफिलीला रंग भरला. सौ. पूनम झा यांनी उत्तम भावभंगीमा द्वारा नृत्य करीत नृत्याचे सजीव चित्रन उभे केले.

     केंद्राचे गुरू व संचालिका कु. प्राजक्ता लक्ष्मीकांत उपरकर यांनी देवी वंदना – नारायणी नमोस्तुते, ताल चौताल-१२ मात्रा, दुर्गा परण आदी परंपरागत नृत्य प्रस्तुती द्वारा प्रेक्षकांना शास्त्रीयरित्या मंत्रमुग्ध करून मैफिलीचा उत्कृष्ट बिंदू गाठला व रसिकांची दाद मिळवली. प्राजक्ता च्या या नृत्याने शास्त्रीय नृत्यात पुढे शिकण्याची व त्यात करियर करण्याची प्रेरणा विद्यार्थीनींना मिळाली.

     “नृत्यांगन डान्स स्कूल” ही एक चंद्रपुरातील अद्वितीय नृत्य संस्था आहे. येथे “कथक” या शास्त्रीय नृत्याचे शुद्ध रूपाने जतन केले जाते. अखिल भारतीय गांधर्व मंडळ द्वारा कथक नृत्याच्या ज्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या, त्याच्या निकालाचे प्रमाणपत्र सुद्धा विद्यार्थीनींना प्रदान करण्यात आले. जयोस्तुते या गीतावर नृत्य करीत कार्यक्रमाची सांगता झाली. सौ. स्वाती घरोटे यांच्या सूत्रसंचालना अंतर्गत हा कार्यक्रम पार पडला. सौ. पूनम झा यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. प्रेक्षकांच्या भरगच्च उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील हा नृत्य कार्यक्रम एक उत्कृष्ट कार्यक्रम ठरला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये