ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिस पाटील भरती प्रक्रियात आर्थिक व्यवहार

पत्रकार परिषदेत उप जिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे यांचा आरोप.

चांदा ब्लास्ट

काही महिन्यापूर्वी शिवसेना तर्फे पोलिस पाटील भरती प्रकियेत उमेदवाराकडून आर्थिक देवाण घेवाण झाल्याचे आरोप करीत या भरती प्रक्रियेची चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले होते.५ सप्टेंबरला स्थानीक व्हॉटसॅप गृपवर खडसंगी येथील युवाभाजपा पदाधिकाऱ्यांनी कबुल केल्याची माहीती शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे यांनी आज ६ सप्टेंबर रोज बुधवारला नेहरू चौक येथील प्रस्तावित पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

तालुक्यातील खंडसंगी येथील स्थानिक व्हॉट्सॲप वर ५ सप्टेंबरला शिवसेनेचे नवनियुक्त उप जिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे तथा युवाभाजपा पदाधिकारी रोशन बन्सोड यांचेत चर्चा रंगली. ज्यात चिमूर तालुक्यातील पोलिस भरती दरम्यान आर्थिक देवान घेवान तथा राष्ट्रीय महामार्ग निर्मीतीच्या कामात पैसे घेतल्यावरून खडाजंगी झाली.याविषयाच्या अनुशंगाने प्रशांत कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेतली.यापत्रकार परिषदेत माहीती देताना कोल्हे यांनी सांगितले की,पोलिस पाटील भरती प्रक्रियेतची चौकशी करण्याची मागणी पक्षातर्फे करण्यात आली होती.तसेच माहिती अधिकाराच्या अंतर्गत माहिती मागविली आणी सदर माहिती प्राप्त होईस्तव शिवसेने कडून करण्यात येणारे आंदोलन आम्ही स्थगित केले होते.युवाभाजपाचे तालुका महामंत्री रोशण बन्सोड यांनी समाज माध्यमावरील चर्चेत पोलीस पाटील भरती प्रक्रियेत पैशे घेतले आणि काम नाही झाले म्हणून परत पण केले. अशी कबुली त्यांनी ग्रुपवर दिल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

कोल्हे यांनी पुढे माहीती देताना रोशण बन्सोड यांचे किराणा दुकान असून अवैध पणे कोरोना काळात मजा सुगंधीत तंबाखू मोठ्या प्रमाणात अव्वाच्या सव्वा किमतीत त्याने विक्री केली. आणी अजुनही हा धंदा सुरु असल्याचे सांगितले.या नेत्याच्या कबुलीने पोलिस पाटील भरती प्रक्रियेत आर्थिक देवान घेवान झाल्याची तसेच भाजपा पक्षाचे नाव घेऊन सर्वसामान्य जनतेला लुटणाऱ्या नेत्याची सखोल चौकशी करण्याची मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन प्रशांत कोल्हे यांनी केली.या पत्रकार परिषदेत शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते,शहर अध्यक्ष नितीन लोणारे,उप तालुका प्रमुख संजय वाकडे, प्रसिद्धि प्रमुख सुनिल हिंगणकर,पुंडलिक सायसे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

यासंदर्भात भाजप युवा मोर्चाचे तालुका महामंत्री रोशन बनसोड यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी लावलेले आरोप फेटाळले त्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचेही त्यांनी सदर प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले .

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये