ताज्या घडामोडी

भद्रावती शहरात बघायला मिळणार भव्य दहीहंडीचा थरार*

चांदा ब्लास्ट :
अतुल कोल्हे भद्रावती :
येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दिनांक ७ सप्टेंबर रोजी शहरातील तालुका क्रीडा संकुल येथे जिल्हाप्रमुख मुकेश मनोज जिवतोडे यांनी भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये विशेष आकर्षण महिलांसाठी दहीहंडी ,वेशभूषा स्पर्धा, रिल्स स्पर्धा व लाईव ओर्केस्टा आनी डांस व विविध कार्यक्रमाचा आस्वाद भद्रावती वासियांना घेता येणार आहे.

भद्रावती शहरात यंदा दहीहंडी उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी दिनांक ७ सप्टेंबर रोजी तालुका क्रीडा संकुल येथे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत पुरुष गटातील ३३ फूट दहीहंडीसाठी ५१ हजार रुपये बक्षीस तर २६ फूट दहीहंडीसाठी ३३ हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे. यासोबतच महिला दहीहंडीचे विशेष आकर्षण राहणार असून महिलासाठी सुद्धा दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांसाठी २१ फूट दहीहंडीसाठी २१ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमादरम्यान वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे, यामध्ये श्रीकृष्ण वेशभूषेसाठी प्रथम बक्षीस ५ हजार , दुसरे बक्षीस ३ हजार व तिसरे बक्षीस २ हजार ठेवण्यात आले आहे,माॅं राधा व माता यशोदा वेशभुषा साठीही एक बक्षीस पांच हजार रुपए ठेवले आहे. तसेच तरुणांसाठी रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात आली असून संपूर्ण दहीहंडी कार्यक्रमाचे उत्कृष्ठ रिल्स बनणाऱ्यांसाठी प्रथम बक्षीस ५ हजार , दुसरे बक्षिसे ३ हजार व तिसरे बक्षीस २ हजार ठेवण्यात आले आहे. यासोबतच दहीहंडी कार्यक्रम संगीतमय वातावरणाने बहरणार असून भद्रावती वासियांना लाईव्ह ओर्केस्टाचा आस्वाद घेता येणार आहे. तरी भद्रावती वायीयानी होणाऱ्या दहीहंडी उत्सवात मोठ्या संख्येने उपस्तिथ राहण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्यासह आयोजन मंडळाचे सदस्य बंडू चटपल्लीवार, राजेश कोठारी, जितेंद्र गुलानी, दिनेश भाऊ पढाल, सुनील रामटेके, सरफराज खान पठाण, महेश जिवतोडे, किर्तीताई पांडे, सुनिता ताई खंडाळकर, जयश्रीताई कामडी, सरलाताई गुलानी, वंदनाताई ऊईके, वर्षाताई पढाल, सुजाताताई बगडे यांनी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे .

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये