पारडी (नगाजी) येथे अवतरणार श्रीपाडुरंग मथुरामय श्रीकृष्ण
चारशे पन्नास वर्षांपासूनची ही परंपरा कायम

चांदा ब्लास्ट :
अतुल कोल्हे भद्रावती :-
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरापासून पासून दक्षिणेकडे १२ कि.मी. अंतरावर असलेले पारडी (नगाजी) हे गांव येथील श्री शिरोमणी श्रीसंत नगाजी महाराज यांचे जन्मस्थान यांचा जन्म होण्या अगोदर प्रत्यक्षात भुजंग नागराज यांचेवर शस्त्रक्रिया करण्याची किमया पाडुरंगाचे असिम भक्त नगाजी महाराजांचे वडील विठोबा यांना स्वप्नात दृष्टांत देवून ती शस्त्रक्रिया करण्याची विनंती काल भुजंग नागराजांनी केली. व त्या शस्त्रक्रियेनंतर भुजंग नागराजांनी विठोबांना याबद्दल काय हवे, असे विचारले तेव्हां त्यांनी सांगितले कि महाराज आपणचं जे ठरवाल तेचं मी स्विकार करील.
त्यावेळी भुजंग नागराजांनी तथास्तु म्हणत *विठोबा- रुखमा* हिचे पोटी पुत्ररत्न म्हणून जन्माला येईल असे वरदान दिले. तेच म्हणजे श्री शिरोमणी नगाजी महाराज हे स्वयं सिध्द विठ्ठल भक्तीचे असीम संत ४५० वर्षाअगोदर नगाजी महाराज होऊन गेले. त्यांची विठ्ठलावर भक्ती व आई-वडीलांची सेवा बघून विठ्ठल पाडुरंग ही बैचेन झाले आणी श्रीसंत नगाजी महाराज ह्यात असतांनी त्यांना दृष्टांत दिला कि गोपाल अष्टीमेचे तिसरे दिवशी मी प्रत्यक्षात तुझे दर्शनाला पारडी पंढरपूर, पाणी येता मथुरा बन हा सोहळा बघण्यासाठी अवश्य हजर राहील. त्या कालखंडापासून भगवान गोपाळकृष्ण विसर्जन दिवसी विसावा घेऊन दुसरे दिवशी अर्थात ०९ सष्टेबर ला २०२३ ला श्री संत नगाजी महाराज या भक्तांचे भक्तीने तल्लीन होऊन प्रत्यक्षदर्शी हजर होतात अशी महती आहे. हीच परंपरा कायम राखत सोनेगांव आबाजी येथील संत आबाजी महाराज यांनी श्रीसंत नगाजी महाराज यांना आपले गुरु मानित श्रीकृष्ण दर्शन करवून घेतले ही एक गुरु शिष्य श्रेष्ठता ही लौकिक ठरली आहे. *गुरु शिष्य भेटी तेव्हां घडे खरी भक्ती, ना अहंकार गुरुला, शिष्य राहे भक्ती तल्लीन हा योग वेगळा, खरा सम जीवनाचा मेळा, ना कुणी जातीने श्रेष्ठ ना कुणी हीन हा मानव धर्म, जीवन माणुसकीचे करा धन्य!!*
तेव्हां श्रीसंत नगाजी महाराज देवस्थान व गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट पारडी यांचे तर्फे हा मनोभाव गुरुभक्ति व शिष्य सोहळा म्हणजेच गोपाळकृष्ण जनोत्मव महायात्रा आयोजित करण्याची परंपरा कायम असून दिनांक ०८ सष्टेबर रोज शुक्रवारला रात्री गोपाळकृष्ण पाळणा उत्सव होऊन दिनांक ०९ सष्टेबर रोज शनिवारला ह.भ.प. लक्ष्मीकांत दुर्गे महाराज यांचे कीर्तन व दुपारी ०३:०० वाजता. दहीहंडी कार्यक्रम व जत्रा महोत्सव होऊन हा देखणा सोहळा संपन्न होईल.तेव्हां भाविक भक्तांनी या गुरुशिष्य परंपरेच्या श्रीकृष्ण विठ्ठल, पाडुरंग दर्शनाचा लाभ घ्यावा असे श्रीसंत देवस्थान व गोपाळकृष्ण देवस्थान ट्रस्टचे नरेंद्र उर्फ राजु मांडवकर, प्रफुल्ल बाडे,राजाभाऊ भोयर, संजय वानकर, मधुकर वतारी, पद्माकर भोयर, मधुकर इंगोले, ज्ञानेश्वर बाराहाते, प्रमोद खुनकर आदी विश्वस्त व गावकरी मंडळीने केले आहे.