ताज्या घडामोडी

जिवती व कोरपणा तालुक्यात शेकडो कार्यकर्त्याचे पक्ष प्रवेश संपन्न..

2024 ची निवडणूक चंद्रपुर लोकसभा बि.आर.एस.जिंकणार...!ज्ञानेश्वर वाकुडकर

चांदा ब्लास्ट :प्रमोद गिरडकर

गडचांदूर चार सप्टेंबर रोजी भारत राष्ट्र समिती राजुरा विधानसभा क्षेत्रात दिनांक 3 सपटेबर ला जिवती तालुकयातील पाटण येथे दुपारी व कोरपणा तालुक्यात गडचांदूर येथे सायंकाळी पक्ष प्रवेश सभा संपन्न झाले.
पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे अध्य्क्ष भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र प्रदेश सदसय ज्ञानेश्वर वाकूडकर होते तर पुर्व विदर्भ चे सहसमन्वयक तथा माजी आमदार साळुंखे गुरूजी व अमरावती विभागाचे बि. आर. एस.चे नेते माजी आमदार राजु तोडसाम यांचे प्रमुख मार्गदर्शनात तसेच वंशिक्रष्णा अरकिल्ला चंद्रपुर जिल्हा समन्वयक,आनंदराव वाय. अंगलवार समन्वयक राजुरा विधान सभाक्षेत्र, रेशमा चव्हाण , महिला समनवयक, संतोष कुळमेथे, व भुषण फुसे विधानसभा सदस्य , अजय सकिनाला राजुरा तालुका समन्वयक, बालाजी करले जिवती तालुका समन्वयक, अरूण पेचे कोरपणा तालुका समन्वयक, ज्योती नळे राजुरा तालुका महिलां समन्वयक, अनसुर्या नुथी, व ईतर मान्यवरांचे उपस्थितीत मान्यवर मार्गदर्शक प्रथम आगमना प्रितयर्थ शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. या प्रसंगी शेकडो कार्यकर्ते पक्ष प्रवेश केले .या प्रसंगी राजुरा विधान सभाक्षेत्र समन्वयक आनंदराव वाय. अंगलवार यांनी राजुरा विधान सभाक्षेत्रात भारत राष्ट्र समिती चे प्रचार , प्रसार गावोगावी करून व सदस्य नोंदनी सर्वानी मिळून 15 हजाराचे वर केलेले असून राजुरा गोंडपिपरी, कोरपणा ,जिवती तालुका व शहर कमेटी तसेच बहुतेक ग्राम कमिटी स्थापना केलेले असून उर्वरित गाव कमेटी पुढील दुसरे टप्प्यात सर्वच कार्यकर्ते व पदाधिकार्याचे सहकार्याने व नियोजनाने पुर्ण करून वरिष्ठांना सादर करणार व पक्ष मजबुत करून आगामी काळात होऊ घातलेले सर्व निवडणुकीत सहभागी होण्यासाठी रणनिती आखणार असे मनोगत व्यक्त केले.
प्रमूख मार्गदर्शनातून साळुंखे गुरूजी यांनी विद्यमान खिचडी सरकार पासून समस्त जनता त्रासलेलै आहे. व चंद्रपुर जिल्हा तेलंगाणा सिमावर्ती असलयाने तेलंगाणा विकास माॅडेल सर्व जनतेला माहीती आहे, कार्यकर्ता घरोघरी पोहचून के.सी.आर.साहेबांचे शेतकरीसह समस्त जनतेचे राष्ट्र व्यापक विकासाचे उदात्त हेतू समजवून सांगण्यास कार्यकर्त्यांना प्रेरित केले. राजू तोडसाम माजी आमदार यानी अपल्या भाषणातून भारतीय जनता पक्षाचै नेतृतवातील सरकार वर हे शेतकरी व मागासवर्गीय जनतेचे विकिसाचे विरोधात भुमिका घेणारे सरकार आहे असा घनाघाती हल्ला केले. व
आदिवासी बहुल दुर्गम भागातील शेतकर्याना शेतजमीनीचे प्रलंबीत पट्टे मिळवुन देऊन शेतकरी वर्गाला न्याय मिळवून देण्यास भारत राष्ट्र समिती तर्फे शासन दरबारी लढा पुकारणार असे प्रतिपादित केले.
अध्यक्षीय मार्गदर्शनातून ज्ञानेश्वरजी वाकुडकर यांनी आपले भाषणातून मार्गदर्शन करताना भारत राष्ट्र समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. के सी.आर. यांचे नेतृत्वातील तेलंगाणा राज्यांत राबविणारे सर्व योजना आगामी काळात महाराष्ट्र सह देशात भारत राष्ट्र समीती सत्तेत आल्यास तेलंगाणा माॅडेल राषट्रीय स्तरावर लागू करून शेतकरी व शेतीवर अवलंबून असणारा समाज यांचे सर्वांगीण विकास साधण्यासाठी दूरदृषटीचे विचार समजवून सांगीतले. तसेच चंद्रपुर जिल्हा हा तेलंगाणा राज्य विकास माडेल नेऐ प्रभावीत जिल्हा असून के.सी.आर.चे विचारांशी प्रेरित असून तेलंगाणातील रोटी- बेटी व्यवहारही असल्याने हा इलाका बि.आर.एस.ने प्रेरित असल्याने याचे पडसाद आगामी काळात होऊ घातलेले सर्व निवडणुकीत मारत राष्ट्र समिती मुसुंडी मारून 2024 चे चंद्रपुर लोकसभा सह जास्तीत जास्त विविध विधान सभाक्षेत्रावर कब्जा करून जिकणार असे प्रभावीपणे कार्यकर्ते यांना प्रेरित केले.
या प्रसंगी भुषणसफुसेसह जनतेतून काही लोकानी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी दोन्ही तालुका सभेत शेकडो कार्यकर्त्यांचा गुलाबी दुपट्टे गळ्यात घालून पक्ष प्रवेश देणयात आले.
बालाजी करले यानी प्रास्ताविक केले व दोन्ही सभा आनंदराव वाय .अंगलवार यांचे मार्गदर्शनात बालाजी करले,इसलाम शेख, विजय राठोड, बालाजी आत्राम ,अरूण पेचे, सुधीर खनके , सुरेंद्र निमकर सह विविध कार्यकर्ते परिश्रम घेतले संचलन करले व सूधीर खनके यानी केऐले तर सुबोध चिकटे स्वपनील उधदार यांनी आभार मानले या प्रसंगी शेकडो कार्यकर्ते व जनता उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये