ताज्या घडामोडी

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातून नागभीड तह वगळन्यासाठी मुंडण आंदोलन

चांदा ब्लास्ट :सुधाकर श्रीरामे

नागभीड जिल्हा निर्मिती कृती समितीच्या वतीने १६ऑगस्ट रोजी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय चिमूर येथून नागभीड तालुका वगळन्यात यावे याकरिता कृती समितीने आंदोलनाचा भाग म्हणून आज मुंडण आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला महा राज्याचे विरोधी पक्ष नेते मा विजय वडेट्टीवार यांनी भेट देऊन महिला मुंडल करणाऱ्या निर्मला कव्हडुजी नवंघडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी कृती समितीला पाठिंबा देत नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, सावली तालुक्यातील जनतेच्या भावना लक्षात न घेता निर्णय घेऊ नये जर घेतलेचतर त्याची जागा दाखवून देण्याची तयारी जनतेच्या मतात आहे त्यामुळे जनप्रतिनिधिने जनतेला वेठीस धरू नये.महाराष्ट्र राज्याचा विरोधी पक्ष नेता या नात्याने चिमूर अप्परजिल्हाधिकारी कार्यालय जनतेच्या सोईसाठी करावे मात्र नागभीड, ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही तालुक्याल वगळन्यात यावे.

याकरिता ब्रह्मपुरी सिंदेवाही, नागभीड, सावली या तालुक्यातील जनतेनी विरोध दर्शवीत जलसमाधी आंदोलन केले. राज्याचे विरोधी पक्ष नेते यांनी लक्षवेधी लावून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. नागभीड जिल्हा निर्मिती कृती समितीने एक पाऊल पुढे टाकीत आज महिला मुंड ल करून आंदोलन सुरु ठेऊन जनतेला नागभीड कृती समिती उपक्रम घेऊन जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये