ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षकांना अतिरिक्‍त करणारे ‘ते’ शासन निर्णय रद्द करा – आमदार सुधाकर अडबाले

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची आग्रही मागणी

चांदा ब्लास्ट

     शाळांमधील संरचनात्‍मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष निश्चित केले असून या शासन निर्णयामधील प्रस्तावित बाबींमुळे व स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्या प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व दर्जावाढ करण्याबाबतच्‍या निर्णयामुळे राज्‍यातील मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्‍त होऊन मराठी माध्यमाच्या शाळा डबघाईस येईल, अशी टिका आमदार सुधाकर अडबाले यांनी केली.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेचे सुधारित निकष व दर्जावाढ करण्याबाबतच्‍या दोन्‍ही शासन निर्णयावर राज्‍यातील शिक्षकवर्ग तीव्र संताप व्‍यक्‍त करीत आहेत. यामुळे शिक्षकहित लक्षात घेता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्‍वात विदर्भातील सर्व जिल्‍हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्यामार्फत शासनास निवेदन सादर करून निषेध नोंदविण्यात आला.

आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्‍वात शुक्रवारी, १७ मे रोजी सदर शासन निर्णयाबाबत अति. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले. शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी अतिशय घातक असणारा सुधारीत संच मान्यतेचा व दर्जावाढ करण्याबाबतचा १५ मार्च २०२४ रोजीचा शासन निर्णय रद्द करण्याबाबत आपण येत्‍या पावसाळी अधिवेशनात सभागृहात प्रश्‍न लावून धरणार असल्‍याचे विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले. सोबतच विमाशि संघाच्या वतीने शासन निर्णय रद्द न झाल्‍यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी पवार, मुख्य वित्त व लेखा अधिकारी गायकवाड, शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्‍विनी सोनवणे, शिक्षण विस्‍तार अधिकारी चालखुरे, समाज कल्‍याण अधिकारी पेंदाम यांच्यासह खाजगी शिक्षणसंस्था संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनील शिंदे, जगदीश जुनगरी, विमाशी संघाचे जिल्‍हा अध्यक्ष केशवराव ठाकरे, जिल्‍हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, मारोतराव अतकरे, लक्ष्मण धोबे, विज्युक्टा अध्यक्ष डॉ. प्रविन चटप, महानगर अध्यक्ष जयंत टोंगे, कार्यवाह सुरेंद्र अडबाले, डॉ. विजय हेलवटे, शालीक ढोरे, कापसे, देवानंद चटप, सतीश अवताडे, शरद डांगे, शकील सर, देवेंद्र बलकी, सचिन मोहितकर, बलवंत विखार, प्रभाकर मते, प्रा. विधाते, प्रकाश कुंभारे, डॉ. धर्मा गावंडे, मोहन गंधारे, बंटी खटी, पेद्दीलवार व विमाशि संघाचे पदाधिकारी, सदस्‍य व शिक्षकवृंदांची उपस्‍थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये