ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंचायत समिती सिंदेवाही सभागृहामध्ये तालुक्यातील गणेश मंडळ तसेच पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम

सिंदेवाही- आज दिनांक 06/09/2023 रोजी येणाऱ्या सार्वजनिक गणेश उत्सवाचे अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीतील शहरातील गणेश मंडळ व ग्रामीण भागातील गणेश मंडळ तसेच पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक पंचायत समिती सभागृह सिंदेवाही येथे घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये शासनाने दिलेल्या सूचना त्यांचे पालन करावे तसेच परवानगी कशाप्रकारे घ्यायचे या संबंधाने सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले.

शासनाने गणेश उत्सवा दरम्यान करण्यात येणाऱ्या देखाव्या संबंधाने तसेच अक्षय पार्थ देखावे कोणीही करणार नाही या संबंधाने देखील सूचना देण्यात आल्या आहे.

सदर बैठक मा. श्री. योगेश शिंदे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली प्रमुख उपस्थिती मध्ये चव्हाण प्रभारी निरीक्षक पोलीस स्टेशन सिंदेवाही, गायधने उप कार्यकारी अभियंता एम एस सी बी सिंदेवाही, ठाकरे वरिष्ठ लिपिक नगरपंचायत सिंदेवाही हे उपस्थित होते.

सदर बैठकीला 70 गणेश मंडळाचे पदाधिकारी, 42 पोलीस पाटील उपस्थित झाले होते. बैठक चे सूत्रसंचालन रणधीर मदारे गोपनीय कर्मचारी यांनी केली असून आभार प्रदर्शन योगेश लोंढे तालुका अध्यक्ष पोलीस पाटील संघटना सिंदेवाही यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये