ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आयुष्य घडवण्याची संधी – आ. अडबाले

कोरपना येथे मी आय ए एस अधिकारी होणारच कार्यशाळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना – स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आयुष्य घडवण्याची मोठी संधीही प्राप्त होते. त्यामुळे या स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांनी सामोरे गेले पाहिजे. आणि आपला सर्वांगिन विकास घडवला पाहिजे असे मतविधान परिषद सदस्य, नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकरराव अडबाले सर यांनी कोरपना येथील मिशन सेवा अभ्यासिका येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकॅडमी द्वारा आयोजित मी आय ए एस अधिकारी होणारच कार्यशाळेप्रसंगी व्यक्त केले.

याप्रसंगी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे यांनी आय ए एस परीक्षेसाठी करावी लागणारी तयारी यासंबंधीची एबीसीडी सांगितली. तसेच या परीक्षेत विद्यार्थ्यांना असलेल्या संधी बद्दल सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे , प्रमुख पाहुणे म्हणून कोरपना च्या नगराध्यक्षा सौ. नंदाताई बावणे, उपाध्यक्ष इस्माईल शेख, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूरचे सचिव नामदेव बोबडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तमराव पेचे, पंचायत समितीचे माजी सभापती श्याम रणदिवे, करियर वाला पुस्तकाचे लेखक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा विजय मुसळे, संयोजक माजी प्राचार्य संजय ठावरी सर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितानी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत कर सहाय्यक व मंत्रालय लिपिक परीक्षा उत्तीर्ण वैभव ढोके, पोलीस भरतीस पात्र ठरलेली सपना किनाके, महात्मा गांधी विद्यालय सोनुरली च्या तंत्र स्नेही शिक्षिका सलमाबी कुरेशी, सेट परीक्षा उत्तीर्ण शिक्षक विशाल बोधाने, सेवानिवृत्त शिक्षक साधूजी बावणे, पुरुषोत्तम उईके, डॉक्टर नरेशचंद्र काठोडे, प्राध्यापक विजय मुसळे यांचा ही सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार अडबाले यांनी मिशन सेवा अभ्यासिकासाठी पाच संगणक संच देण्याची घोषणा केली. याच प्रकारची कार्यशाळा कोरपना तालुक्यातील गडचंदुर, नांदा, धानोली, कोरपना येथे अकरा शाळा महाविद्यालयात घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन श्रावणी अवथरे, समिधा जुमडे तर आभार दिनकर सोनटक्के यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य संजय ठावरी,नितीन बावणे, संजीव चांदुरकर, सतीश गज्जलवार, विजय गोवारदिपे,बंडू भगत, आकाश मेश्राम दीपक पारखी ज्ञानदीप वैरागडे उल्हास परसुटकर, अनुराग ठावरी यांनी अथक परिश्रम घेतले.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक, निमंत्रित पाहुणे, नागरिकांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये