ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजरंग : चंद्रपूर लोकसभा., जरा हटके ठरणार यंदाचा “राजकिय शिमगा”? – महेश पानसे

चांदा ब्लास्ट

      लोकसभा निवडणुकीच्या सावटाखाली व राजकिय खलबतांच्या चर्चेनी गाजणारा यंदाचा शिमगा हा राजकिय शिमगा ठरला किंवा ठरणार असे म्हंटल्यास वावगे नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असताना, चंद्रपूर लोकसभा मतदार संघात सर्व स्तरातून कांग्रेस उमेदवारीला धरून सतत चर्चा असताना, घंटया घंटयाला उत्सुकता वाढत असताना, व तिकडे भा.ज.पा. कंपूतही प्रतिस्पर्धी कोण? हि ऊत्कंठा असताना आज साजरा होणारा शिमगा ‘राजकिय शिमगा’ ठरला म्हंटल्यास चुकीचे ठरणार नाही. आचारसंहिता सुरू असल्याने व त्यातल्या त्यात कांग्रेसचा गडी ठरला नसल्याने शिमगा कुणाच्या नावावे साजरा करायचा या विवंचनेत भा.ज.पा.वाले आहेत.

तर इकडे कांग्रेस मध्ये दोन गटात बे- मौसम शिमगा केव्हाचाच सुरू असल्याने व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील बहुसंख्य मतदार यात रंगीबेरंगी चर्चा घेऊन उतरल्याने यंदा शिमगोत्सव राजकिय ठरला आहे. आपला परंपरागत शिमगा आज साजरा झाल्यानंतर मतदान होईस्तोवर राजकिय पिचकाऱ्यांची भरमार व चिखलफेक राहणार असल्याने यंदाच्या शिमग्याला पुरा राजकिय रंग चढला आहे.

१९ एप्रिलला चंद्रपूर लोकसभा (पहिला टप्पा) मतदान होणार आहे. संपूर्ण शाशकीय यंत्रणा राजरंगाच्या जबाबदारीने आधिच भिजली आहे. परिवारासोबत शिमगा साजरा करणे यंदा त्यांना जमायचे नाही. भा.ज.पा. उमेदवार आधिच पिचकारी घेऊन सेनेसह मैदानात उतरले आहेत. पण शिमगा(धुलीवंदन) साजरा करायचा समोर विरोधक सज्ज नाहीत. त्यांचा हिरमोड झाला खरा पण यंदा भाजपा गोटातून राजकिय शिमगोत्सव केव्हाच सुरू झालेला आहे. कांग्रेसप्रेमी जरा या बाबतीत दुर्देवी ठरले आहेत.सेनापती नसल्याने शिमगोत्सव कसा साजरा करायचा या टेंशन मध्ये कांग्रेसजन आहेत.

मात्र, पक्षांतर्गत दोन गटात एकमेकांवर राजकिय गुलालफेक सुरू असल्याने व साऱ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचल्याने कांग्रेसजनांसाठीही हा राजकिय शिमगा ऊत्कंठेचा ठरला म्हणायला वाव आहे. परंपरागत शिमगा आज साजरा होईल पण गत १० दिवसापासून तर पुढील पंचेविस दिवस राजकिय झलक दिसणारा खरा शिमगा साजरा होणार आहे.

आरोप प्रत्यारोपाची गुलालफेक, आश्वासणांची रंगीबेरंगी उधळण, राजकिय चिखलफेक याची भरमार राहणार असल्याने यंदाचा हा राजकिय शिमगा उत्सुकतेचा असणार आहे हे विशेष. थोडी गडबड झाली. कांग्रेसचा गडी ४ दिवस आधी मैदानात उतरला असता तर यंदाचा चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील शिमगा जरा हटके राहिला असता. काही हरकत नाही पुढील पंचेविस दिवस शिमगा साजरा करायला शिल्लक आहेत.

     कांग्रेस हायकमान धुलीवंदनाच्या शुभेच्छा कुणाच्या झोळीत टाकतील हे कळले असेल किंवा आज कळेल. मतमोजणी नंतर चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात यंदाचा राजकिय शिमगा कुणी कुणाच्या नावावे साजरा केला हे ही कळणारच आहे.

 एवढे मात्रं नक्की की यंदाचा शिमगा (धुलीवंदन) चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात पुरेपूर राजकिय शिमगा ठरला म्हणता येईल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये