ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तालुका आरोग्य कार्यालय ब्रम्हपुरी येथे जागतिक क्षयरोग दिनाचा कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

दि. २४ मार्च ला तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय ब्रम्हपुरी येथे जागतिक क्षयरोग दिनाचा कार्यक्रम सहायक संचालक आरोग्य सेवा डॉ. संदीप गेडाम, तालुका आरोग्य अधिकारी ब्रम्हपुरी डॉ विलास दूधपचारे, तालुका आरोग्य अधिकारी नागभीड डॉ. विनोद मडावी यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.

रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेचे पूजन करून, क्षयरोग मुक्त भारत या केंद्र सरकार च्या महत्वाकांक्षी धोरणानुसार २०२५ पर्यंत सम्पूर्ण भारत क्षयरोग मुक्त करण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य सेवांसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांचे सहकार्य योगदान, तळागाळापर्यंत जनजागृती, शासनातर्फे पुरविण्यात येणाऱ्या सर्व निशुल्क आरोग्य सोयीसुविधाचा क्षयरुग्णांना लाभ, निक्षय पोषण योजने अंतर्गत आर्थिक मदत, समाजातील दानशूर व्यक्ती संस्था निक्षय मित्र यांचेकडून रुग्णांना सकस आहाराचा लाभ, क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार इत्यादी अनेक विषयांवर वर डॉ. गेडाम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 डॉ. दूधपचारे, डॉ. मडावी, टिबी पर्यवेक्षक राजीव खोब्रागडे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यालयातील सर्व आरोग्य कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये