ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांनी देशाचे नाव उंचवावे – आमदार सुधाकर अडबाले

रफी अहमद किदवाई हायस्कूल येथे सत्‍कार समारंभ

चांदा ब्लास्ट

रफी अहमद किदवाई हायस्कूल तथा महाविद्यालय हे जिल्ह्यातील एकमेव उर्दू मिडीयम शाळा आहे. या शाळेत पहिली ते पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय असून पुस्‍तकातील ज्ञानासोबतच प्रॅक्‍टीकल ज्ञान सुद्धा दिले जाते. याच जोरावर येथील विद्यार्थ्यांनी दहावी, बारावी व पदवीमध्ये घवघवीत यश संपादन केले. या गुणवंतांनी भविष्यात देखील यशाची परपंरा कायम ठेवत पालकांचे, शाळेचे व देशाचे नाव उंचवावे, असे प्रतिपादन आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.

रफी अहमद किदवाई हायस्कूल तथा महाविद्यालय, चंद्रपूर येथे आयोजित नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांचा सत्कार सोहळा व शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्‍कार समांरभाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी रफी अहमद किदवाई मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष मो. शफीक अहमद, कार्यकारी अध्यक्ष मो. मकसुद अहमद, उपाध्यक्ष मो. हैदर भाई, सचिव ॲड. इकबाल अहमद, सदस्य ॲड. सत्तार अहमद, जैहेरुद्दिन काझी, हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रिन्‍सिपल मो. सादिक शेख, सिनियर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. नियाज कुरेशी, प्रायमरी मुख्याध्यापक मो. अलियार खान, पर्यवेक्षक मो. उस्मान शेख, मो. साबीर शेख, शकील सर आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातून प्रचंड मताधिक्‍याने विजयी झाल्‍याबद्दल आमदार सुधाकर अडबाले यांचा शाल, पुष्पगुच्‍छ व सन्‍मानचिन्‍ह देऊन संस्‍थेचे अध्यक्ष शफीक अहमद यांच्या हस्‍ते सत्कार करण्यात अाला. तसेच शाळेतील दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्‍ते भेटवस्‍तू, प्रमाणपत्र व सन्‍मानचिन्‍ह देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच सध्या युएसएमध्ये वास्‍तव्‍यास असलेली शफीक अहमद यांची कन्‍या रूबिना शफीक अहमद यांच्यावतीने अलहाज शफीक अहमद अवार्ड २०२३ म्‍हणून शाळेतून दहावी, बारावीत प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्‍या गुणवंतांना रोख रक्‍कम, सन्‍मानचिन्‍ह देऊन गौरविण्यात आले.

संचालन साबीर शेख यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. सुफी समिना यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये