ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिकारीच्या शोधात असताना पट्टेदार वाघाचा विहिरीत पडून मृत्यू

कुजलेल्या अवस्थेत मिळाले वाघाचे शव : चालबर्डी शेत शिवारातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

             तालुक्यातील चालबर्डी येथील पडीत शेत शिवारात शिकारीच्या शोधात असलेल्या पट्टेदार वाघाचा कठडे नसलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक १८ जानेवारी ला उघडकीस आली. या वाघाचा तीन दिवसापूर्वीच मृत्यू झाला असावा असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.

           हा पट्टेदार वाघ पाच वर्षे वयाचा असून नर जातीचा आहे.

 चालबर्डी येथील शेत सर्वे क्रमांक ५४ मध्ये शिकारीच्या शोधात असताना कठडे नसलेल्या विहिरीत पडून पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला ही घटना तीन दिवसानंतर म्हणजेच दिनांक १८ जानेवारी ला वनरक्षक जे. ई. देवगडे यांना माहिती मिळाली. त्यांनी या घटनेची माहिती भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी एच.पी. शेंडे यांना दिली. माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक वन संरक्षक जी. आर. नायगमकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता नर जातीचा पट्टेदार वाघ हा कुजलेल्या अवस्थेत आढळला.

त्या पट्टेदार वाघाचे शव टीटीसी चंद्रपूर येथे नेण्यात आले. तिथे डॉ. कुंदन पोडचलवार व डॉ. आर एस रोडे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले. घटनेचा पुढील तपास वन अधिकारी करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये