ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची विस्तारित बैठक संपन्न

शेतकरी, असंघटित कामगार, विद्यार्थी, बेरोजगार युवक - महिला व शेतमजुरांच्या प्रश्नावर चर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची विस्तारित बैठक शहरातील शहीद हुतात्मा स्मारक येथे नुकतीच कॉमरेड अरविंद कुमार कॅप्टन जिल्हा कार्यकारणी सदस्य यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉमरेड प्रा. नामदेव कन्नाके जिल्हा सचिव भाकपा चंद्रपूर, कॉमरेड रवींद्र
उमाटे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य, कॉमरेड राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव भाकपा, कॉमरेड प्रकाश रेड्डी महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य, किसान सभा. कॉमरेड दिलीप वणकर आयटक कामगार नेते वे को ली भद्रावती इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या बैठकीत शेतकरी, असंघटित कामगार, विद्यार्थी, बेरोजगार युवक – महिला
व शेतमजुरांच्या प्रश्नावर चर्चा होऊन मागण्यांना घेऊन प्रखर लढा उभारण्याचे ठरले. आगामी 10 सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथे होणाऱ्या या जिल्हा अधिवेशनात सहभागी होण्यासाठी दहा प्रतिनिधिंची निवड करण्यात आली. या विस्तारित बैठकीत बैठकीत
कॉ. प्रा नामदेव कन्नाके, कॉमरेड रवींद्र उमाटे, कॉमरेड राजू गैनवार, कॉमरेड अरविंद कुमार कॅप्टन यांनी मार्गदर्शन केले
या बैठकीत पुढील ठराव पारित करण्यात आला. ज्यामध्ये लोकसभा निवडणूक 2024 मध्ये इंडिया पक्षाचे उमेदवार यांना पाठिंबा देणे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा क्षेत्र लढविण्याचे प्रागतिक पक्ष. भा क पा यांना पाठिंबा देणे. 12 आगस्ट 2023 रोजी जिल्हा कौन्सिल बैठकीचे रीपोरटींग करण्यात आले. पक्ष सभासद नोंदणी – पूनरनोदणी आढावा घेण्यात आला. या बैठकीत प्रास्ताविक कॉ. शेख शकील यांनी केले तर संचालन कॉ. नितीन कावटी यांनी केले. आभार प्रदर्शन कॉ. नसरीन पठाण यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्या करिता कॉ. वंदना गैनवार, कॉ. विद्या घोगरे, कॉ. सुगंधा पेंदाम, कॉ. कोमल गैनवार, कॉ. वनवास राऊत व कॉ. धनराज नंन्नावरे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये