Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बिडीओ लाच प्रकरणी तेंदू कंत्राटदार युनियन कंत्राटदाराच्या पाठीशी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

अहेरी तालुक्यातील गोंविंदगाव येथील तेंदूपत्ता लिलाव प्रक्रियेत घेऊन सदर तेंदूपत्त्याच्या वाहतूक परवण्यासाठी नाहरकत देण्यासाठी प्रभारी गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार व तालुका पेसा समन्वयक संजीव कोठारी यांनी आधीच आर्थिक तंगीत असलेल्या कंत्राटदारांला एक लाख तीस हजार रुपयांची मागणी केली आणि कंत्राटदराचे आर्थिक आणि मानसिक छळ केले आहे यामुळे सदर कंत्राटदाराने लाच देण्याची इच्छा नसल्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे तक्रार दाखल केले आणि प्रभारी गटविकास अधिकारी अहेरी प्रतीक चन्नावार,पेसा समन्वयक संजीव कोठारी यांना रंगेहाथ पकडून दिले.

यात आरोपी अहेरी पंचायत समिती कार्यलयाचे प्रभारी गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार फरार झाले तर मौक्यावर पेसा समन्वयक संजीव कोठारी आणि अनिल गोवर्धन यांना अटक करण्यात आले होते न्यायालयाने दोन्ही आरोपींना 28 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती तसेच प्रभारी गटविकास अधिकारी फरार आहे.

पेसा तेंदू प्रक्रियेत पंचायत समिती कार्यालयाचे कोणतेही अधिकारीक हस्तक्षेप नसतांनाही अहेरी उपविभात कोणतेही मोगम कारणे दाखवून लाच घेण्यासाठी पंचायत समिती कार्यलयाच्या वतीने उपवनसंरक्षक कार्यलयांना पत्र लिहून पंचायत समितीचे नाहरकत प्रमाणपत्र दिल्याशिवाय अंतिम टिपी देण्यात येऊ नये बोलले जाते.तेंदू कंत्राटदार युनियनच्या सदस्यांवर अन्यायिक कार्य ह्या भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारींच्या वतीने करण्यात आला म्हणून तेंदू कंत्राटदार युनियनच्या वतीने सदर प्रकरणाचे विरोध केले आहे आणि युनियनचा प्रत्येक सदस्य कंत्राटराच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे होणाऱ्या चर्चेत बोलले.

सदर प्रकरण घडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे तसेच आणखी काही कंत्राटदारांना अहेरी पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने असाच मानसिक आणि आर्थिक त्रास दिल्याचे उघडकीस येण्याची शक्यता आहे म्हणून सदर प्रकरणात कंत्राटदाराच्या वतीने बयाने नोंदविण्याची शक्यता आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये