ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री. किृष्ण जन्माष्टमी निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत

शोभायात्रेत सहभागी भाविकांसाठी शितपेयाचे वाटप

चांदा ब्लास्ट

श्री.किृष्ण जन्माष्टमी निमित्त शहरातुन निघालेल्या शोभायात्रेचे गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी भाविकांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाचे वाटप करण्यात आले.

     यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्तामहिला शहर संघटिका वंदना हातगावकरसायली येरणेअल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेनशहर संघटक विश्वजीत शहाशहर संघटक करनसिंह बैसकार्तिक बोरेवारनिलिमा वनकरकविता निखारेवैशाली मद्दीवारअनिता झाडेसतनामसिंह मिर्धा आदींची उपस्थिती होती.

   दरवर्षी प्रमाणे यंदाही किृष्ण जन्माष्टमी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त शहरात दहीहांडी सह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर सायंकाळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत मंच तयार करण्यात आले होते.

सदर शोभायात्रा स्वागत मंच येथे पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी शोभायात्रेत सहभागी भाविकांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाचे वाटप करण्यात आले. शोभायात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये