ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्राचार्या स्मिता चिताडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

शिक्षक दिनी मुंबई येथे होणार सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2022-23 साठी महात्मा गांधी विद्यालय, व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथील कर्तव्य दक्ष मुख्याध्यापिका तथा प्राचार्या सौ स्मिताताई अनिलराव चिताडे यांना जाहीर झाला आहे, येत्या 5 सप्टेंबर ला शिक्षक दिनी मुंबई येथे आयोजित केलेल्या समारंभात त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात येणार आहेत.

प्राचार्या  स्मिता चिताडे यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल शासनाने त्यांची निवड केली आहे.

प्राचार्या स्मिता चिताडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार ऍड विठ्ठलराव धोटे, विद्यमान अध्यक्ष आमदार सुभाष धोटे,सचिव धनंजय गोरे,सर्व पदाधिकारी व संचालक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये