Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

WCL क्षेत्रात कोल तस्करीतून वाढते गँगवार व गंभीर अपराध रोखण्याचे हंसराज अहीर यांचे निर्देश

ड्रोनचा वापर करण्याची वेकोलि प्रबंधनास सूचना ; पिडीत, ग्रामिण मागासवर्गीय नागरिकांच्या तक्रारीनुसार आयोगाद्वारे सुनावणी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर, यवतमाळ व अन्य जिल्ह्यांमधील वेकोलि खाण क्षेत्रात, क्षेत्रालगतच्या वसाहती तसेच ग्रामिण भागात वेकोलि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीत व बेजबाबदार वृत्तीमुळे कोळसा चोरींचे प्रमाण वाढले असुन यातून टोळ्या-टोळ्यांचे माध्यमातून अवैध धंद्यांना प्रोत्साहन मिळाल्याने गंभीर स्वरूपाच्या गुन्हयांमध्ये वाढ झाली आहे. या क्षेत्रात गँगवार, खुनीसंघर्ष व निर्घृण हत्यांसारखे प्रकार राजरोसपणे सुरू असल्याने वेकोलि क्षेत्रांमध्ये आधुनिकीकरणाचा अवलंब करून ड्रोनद्वारे निगरानी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी वेकोलि प्रबंधनाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना सुनावणी दरम्यान दिले.

            उपरोक्त विषयाला घेवून त्रस्त मागासवर्गीय नागरीक तसेच ग्रामिण क्षेत्रातील प्रकल्पपिडीतांनी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची गांभिर्याने दखल घेवून मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी दि. 25 ऑगस्ट 2023 रोजी क्षेत्रीय कार्यालय वेकोलि माजरी येथे सुनावणी घेत या प्रश्नी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. एनसीबीसी अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सुनावणीला वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक मनोज कुमार, चंद्रपूरच्या अतिरीक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, यवतमाळचे अतिरीक्त पोलिस अधिक्षक पियुष जगताप, वेकोलिचे मुख्य सुरक्षा अधिकारी कमांडंट विक्रांत, वेकोलि वणी चे क्षेत्रीय महाप्रबंधक आभाषचंद्र सिंह, वेकोलि चंद्रपूर क्षेत्राचे महाप्रबंधक संजय वैरागडे, वणी नॉर्थ क्षेत्राचे श्रीवास्तव, माजरी क्षेत्राचे इलियाज हुसैन यांची या सुनावणीला प्रामुख्याने उपस्थिती होती.

            सदर सुनावणीत हंसराज अहीर यांनी वेकोलितील वाढत्या गुन्हेगारीला वेकोलि  प्रबंधनास जबाबदार ठरवित या गुन्हेगारीच्या उच्चाटनाकरीता अंतर्गत व परिसरातील सुरक्षा यंत्रणा अत्याधुनिक व सुसज्ज ठेवण्याची सुचना केली. पेट्रोलिंग व शस्त्रसज्ज सुरक्षा रक्षकांच्या संख्येत वाढ करीत स्थानिक पोलिस विभागाशी समन्वय व संपर्क प्रस्थापित करीत त्यांच्या सहकार्याने वेकोलि क्षेत्रातील चोऱ्या व गुन्हेगारीवर अंकुश घालण्याचे निर्देश दिले.

            या सुनावणी दरम्यान उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी काही विधायक सुचना करीत त्या अध्यक्ष महोदयांच्या निदर्शनास आणल्या. वेकोलि क्षेत्राच्या 10 किमी अंतरावर स्क्रॅपच्या दुकानांना अनुमती देवू नये याकरिता वेकोलि प्रबंधनाने निवेदनाव्दारे संबंधितांकडे मागणी करावी, वेकोलिच्या अनेक क्षेत्रामध्ये अजुनही चोऱ्यांचे प्रमाण जैसे थे सुरू असल्याने. वेकोलि प्रबंधनाने ड्रोन एजन्सीद्वारा न घेता स्वतः ड्रोनची खरेदी करून या अनुचित घटनांवर नियंत्रण ठेवावे, ज्यादा मनुष्यबळ असलेल्या ठिकाणी कामगारांना सुरक्षा कामी नियुक्त करावे अशा सुचना सुध्दा श्री. अहीर यांनी उपस्थित वेकोलि अधिकाऱ्यांना केल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये