Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मेरी माटी मेरा देश अंतर्गत घेण्यात आलेल्या घोषवाक्य स्पर्धेत पाथरी शाळेची विद्यार्थिनी जिल्ह्यात प्रथम

सावली तालुक्याला मानाचा तुरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

“मेरी माटी मेरा देश” अंतर्गत “शिक्षण विभाग (प्राथमिक) जि. प.चंद्रपूरच्या वतीने दि.07 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2023 या कालावधीत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

वर्ग 6 ते 8 साठी असलेल्या दुसऱ्या गटातील “घोषवाक्य स्पर्धेत” जि.प. उच्च प्राथमिक शाळा पाथरीची विद्यार्थिनी कु.गुंजन प्रशांत उंदिरवाडे, वर्ग 7 वा” या विद्यार्थिनीने चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल आज दि.23 ऑगस्ट 2023 रोजी डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम निसर्ग उद्यान चंद्रपूर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय कार्यक्रम अंतर्गत झालेल्या सत्कार कार्यक्रमात मा. ना. श्री.सुधीर मुनगंटीवार मंत्री, वने,सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी मा. आ.श्री.किशोर जोरगेवार आमदार चंद्रपूर, मान. श्री.विनय गौडा जी.सी. (भाप्रसे) जिल्हाधिकारी चंद्रपूर, मान. श्री. विवेक जॉनसन (भाप्रसे) मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.चंद्रपूर,श्री.राजकुमार हिवारे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प. चंद्रपूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्याध्यापक श्री. कमलनयन बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री.योगेश पवार विषयशिक्षक यांनी गुंजनला योग्य असे मार्गदर्शन केले.

गुंजनच्या या यशाबद्दल मधुकरजी वासनिक,संवर्ग विकास अधिकारी पं. स. सावली,लोकेश खंडारे, गटशिक्षणाधिकारी पं. स.सावली,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, गावातील नागरिकांनी कु. गुंजन उंदिरवाडे व तिचे मार्गदर्शक शिक्षक योगेश पवार यांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये