ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

३७ गोवंशासह १६ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

चांदा ब्लास्ट

जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन ह्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात पदभार सांभाळल्यानंतर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर चांगलीच संक्रांत आली असुन जिल्हाभर पोलीस अलर्ट मोड वर आल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात सातत्याने अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई सुरू असल्याने अवैध सुगंधी तंबाखू, दारू तसेच गोवंश तस्करांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत.

ह्याच कारवाईचा भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. महेश कोंडावार यांनी विविध पथके नेमुन धंदयावर कारवाई सुरू केली आहे. ह्या अनुषंगाने दि. ३/५/२०२४ रोजी रात्री पेट्रोलिंग दरम्यान मुल मार्गे अवैधरीत्या कत्तलीकरीता जनावरे कोंबुन भरलेला ट्रक CG२४५७६६७ हा चंद्रपुर कडे येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील पथकाने पोलीस स्टेशन मुल हद्दीत रेल्वे गेट जवळ नाकेबंदी केली असता एक ट्रक रेल्वे गेट कडे येतांना दिसला त्यास थांबविण्यास सांगितले असता ट्रक रोडच्या बाजुला थांबला तितक्यात ट्रकमधील दोन ईसम अंधाराचा फायदा घेउन जंगलाकडे पळुन गेले. त्यांचा शोध घेतला असता मिळुन आले नाही. ट्रक ड्रायव्हरला खाली उतसवुन त्यास सखोल विचारपुस केली असता त्याने आपले नाव नईमउद्दीन करीमउद्दीन शेख वय ३९ वर्षे रा.शांतीनगर, घुग्घुस ता.जि. चंद्रपुर असे सांगितले. व पळुन गेलेले ईसम हे १) असलम शेख २) इर्शादउल्ला खान दोन्ही राह. मुर्तिजापुर जि. अकोला असे सांगितले. तसेच सदर जनावरे कुरखेडा घाट जि. गडचिरोली येथुन आणले असुन सादिक खान रा. गडचांदुर याने आणण्यास सांगितले असल्याची माहिती दिली.

सदर ट्रकची पंचासमक्ष झडती घेतली असता ट्रकमध्ये ३७ गोवंश निर्दयतेने पाय बांधुन कोंबुन असल्याचे दिसले तसेच त्यामध्ये काही जनावरे मृत असल्याचे आढळुन आले. महाराष्ट्रात जनावरे कत्तल करणे, कत्तल करण्याचे उद्देशाने वाहतुक करणेस प्रतिबंध असतांना सुध्दा सदर जनावरे कत्तलीसाठी ट्रक मध्ये क्षमतेपेक्षा जास्त भरून कुरतेने निर्दयतेने अवैधरीत्या वाहतुक करीत तेलंगणा राज्यात नेत असल्याचे समजले. सदर ट्रकमध्ये असलेले गोवंश तसेच वाहनाची एकत्रित अंदाजे किंम१६,५०,०००/-रू (सोळा लाख पन्नास हजार) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन एका आरोपीस घटनास्थावरून ताब्यात घेउन आरोपीस पुढील तपासकामी पोलीस स्टेशन मुल यांचे ताब्यात देण्यात आले.

तसेच वाहनामधील ३३ जिवंत गोंवंश जनावरे यांची देखरेख करण्याकरीता प्यार फाउंडेशन दाताळा रोड, चंद्रपुर येथे जमा करण्यात आले. व ४ मृत गोवंश जनावरांचा पंचासमक्ष पशुवैद्यकिय अधिकारी, चंद्रपुर यांचे कडुन पोस्टमार्टम करून घेण्याचे सुचनापत्र देण्यात आले.

सदर कर्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि. विनोद भुरले, पो.हवा. नितीन साळवे, प्रकाश बलकी, सुभाष गोहोकार, नापोशि संतोष येलपुलवार, पोशि. नितीन रायपुरे, चापोहवा दिनेश अराडे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये