ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

         आज दिनांक २३/०८/२०२३ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्ह्यातील प्रवासी बस चालक यांचे करिता नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा शल्यचिकित्सक वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. सदर शिबिरास अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री समीर शेख व जिल्हा शल्य चिकित्सक श्री सचिन तडस लाभले होते. आपल्या प्रास्ताविकात श्री तडस यांनी शिबिराच्या तयारी विषयक व केल्या जाणाऱ्या चाचण्या विषयक माहिती दिली. या संपूर्ण चाचण्या मोफत केल्या जातील असे सांगितले.

जिल्ह्यातील अपघाता चे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने सदर शिबिर आयोजित करण्यात येत असल्याचे श्री समीर शेख यांनी सांगितले.आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात, अपघाताचे जिल्ह्यातील प्रमाण कमी करण्यासाठी शासन करीत असलेल्या उपाय योजनांची माहिती दिली व याचाच एक भाग म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे व त्याचा जास्तीत जास्त वाहन चालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
सदर शिबिरात एकूण १०२ वाहन चालकांची तपासणी करण्यात आली.नेत्र चिकित्सा तपासणी करण्याकरिता डॉ.मनोज सक्तेपार यांच्या मार्गदर्शनात अनिल वरघट, अश्विनी गावंडे, किशोर मेश्राम व प्रफुल काकडे यांनी काम पाहिले तर NCD विभागात डॉ. माधुरी निमसटकर यांच्या मार्गदर्शनात गीता लाडे,मंजुषा पाटील, मितला गोहाडे माधुरी लोखंडे, अश्विनी आसुटकर वैशाली साबळे सुकांत येसनकर यांनी काम पाहिले.

सदर शिबिराच्या यशस्वी ते करिता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री समीर शेख यांच्या मार्गदर्शनात मोटर निरीक्षक मेघल अनासाने, तुषारी बोबडे, गोपाल धूर्वे, साधना कवळे विशाल मोरे, सहायक मोटर निरीक्षक मंगेश राठोड अनुराग सालंकर विशाल भगत निखिल कदम अमर पाखान आदित्य ढोक श्रीकांत येवले वाहन चालक पांडुरंग वाघमारे घनश्याम टिकस नरेंद्र तिवारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विजय ओझा यांनी तर आभार प्रदर्शन मेघल अनासाने यांनी केले.

याव्यतिरिक्त दिनांक २४/०८/२०२३ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे तर दिनांक २५ व २६/०८/२०२३ रोजी उपजिल्हा सामान्य रुग्णालय हिंगणघाट येथे आणि दिनांक २५/०८/२०२३ रोजी उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे याद्वारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वर्धा व जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा यांनी जिल्ह्यातील सर्व प्रवासी बस चालक यांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये