Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स तर्फे होतकरू व गरीब विद्यार्थिनीला भ्रमण ध्वनी भेट

विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाद्वारे अभ्यास करणे सोईचे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

महाविद्यालया तर्फे विद्यार्थ्यांच्या हितासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारच्या बेस्ट राबविण्यात येतात. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेअंतर्गत श्रमाचे महत्त्व विद्यार्थ्याना पटवून अर्थाजनासाठी प्रोत्साहित करणे तसेच विद्यार्थी सहायता निधी मधून विद्यार्थ्यांना विविध आर्थिक सहायता प्रदान करणे तसेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविणे यासाठी महाविद्यालय नेहमी अग्रेसर असते.

बेस्ट प्रॅक्टिसचा एक भाग म्हणून महाविद्यालयाची होतकरू व गरीब विद्यार्थिनी कुमारी शिवकुमार केवट हीला महाविद्यालयातर्फे एक भ्रमणध्वनी भेट देण्यात आला आहे. जेणेकरून तिला सुलभ होईल. यावेळी महाविद्यालयीन बेस्ट प्रॅक्टिस अंतर्गत आयोजित कार्यक्रमात गडचांदुर शिक्षण प्रसारक मंडळ चे सचिव श्री धनंजय गोरे, महाविद्याचे प्राचार्य डॉक्टर शैलेंद्र देव,कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती चिताडे मॅडम यांच्या हस्ते कुमारी शिवकुमारी केवट हिला भ्रमणध्वनी भेट देण्यात आला.

यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते सर्वांनी शिवकुमारी हिचे अभिनंदन करीत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्यात.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये