Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सायबर पोलीस स्टेशन मार्फत फसवणुकीचा गुन्हा उघड

आरोपीतांकडुन महाराष्ट्रासह इतर राज्यातील गुन्हे उघड येण्याची शक्यता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 10/06/2023 रोजी फिर्यादी ही घरी हजर असताना फिर्यादी यांना त्यांचे मोबाईलवर कॉल आला व आपले पार्सल मध्ये 6 किलो कापड, 5 पासपोर्ट, 6 क्रेडीट कार्ड व 140 ग्रॅम एम. डी. ड्रग्स नावाचे अंमली पदार्थ सापडले असुन आपण सायबर पोलीसांशी बोला असे सांगुन तिला भिती दाखवुन व धमकावुन फिर्यादीला वेगवेगळे कारण सांगुन वेगवेगळया अंकाऊंटमध्ये एकुण 2,47,776 /- रु ची फसवणुक केली. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरुन दिनांक 27/06/2023 रोजी सायबर पोलीस स्टेशन येथे अप क्र. 01/2023 कलम 419, 420 भादवि सहकलम 66 (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाचा सुपर्ण तांत्रीक पद्धतीने तपास केला असता व संपुर्ण तांत्रीक बाबींचे विष्लेशन करुन सदरचे आरोपी हे नांदेड व औरंगाबाद येथे असल्याचे निष्पन्न झाले. मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे आदेशान्वये सायबर पो.स्टे मार्फत एक पथक तयार करुन दिनांक 17/07/2023 रोजी सदरचे पथक हे नांदेड येथे पोहचुन आरोपी नामे अंबादास जनार्धन कांबळे वय 35 वर्ष रा. विष्णु नगर, नांदेड यास ताब्यात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्याने त्याचे सोबत आरोपी नामे अनिल संभाजी निकम वय 49 वर्ष रा. द्वारकाधीश नगर, औरंगाबाद हासुद्धा असल्याचे सांगितल्याने सदरचे पथक नांदेड येथुन तात्काळ औरंगाबाद येथे पोहचुन आरोपीचा शोध घेवुन आरोपी नामे अनिल संभाजी निकम वय 49 वर्ष रा. द्वारकाधीश नगर, औरंगाबाद यास ताब्यात घेतले. सदर आरोपीतां कडुन गुन्हयात वारण्यात आलेले बॅक खात्याचे 1 चेक बुक, 2 मोबाईल, 7 एटीएम कार्ड असा एकुण 20,000 /- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीतांचे बँक खात्याचे निरीक्षण केले असता त्यांच्या खात्यात कोटींची उलाढाल झालेली असल्याचे निदर्शनास आलेले आहे. आरोपीतांकडुन महाराष्ट्रासह इतर राज्यातील गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्री सागर कवडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री कांचन प. पांडे, सायबर पोलीस स्टेशन वर्धा यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात व निर्देशाप्रमाणे पोलीस अंमलदार वैभव कट्टोजवार, निलेश तेलरांधे, रंजीत जाधव, अनुप राऊत, अमित शुक्ला, अनुप कावळे, प्रतिक वांदीले, मपोशि लेखा राठोड सर्व सायबर पोलीस स्टेशन वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये