ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर परिषद नागभीड येथे आजादी का अमृत महोत्ववाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड नगर परिषद येथे माझी माटी माझा देश अभियांना त र्गत नागभीड कार्यालयात आजादी का अमृत महोत्सवाचे अभियानाअंतर्गत व केंद्र शासनाचे उपक्रम मेरी मा टी माझा देश अर्थात माझी माती माझा देश या अभियानाअंतर्गत १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२३रोजी पर्यंत हर घर तिरंगा अभियान रबविण्यात येत आहे. नगर परिषद हद्दीतील सर्व नागरिकांनी नगर परिषद कर्मचारी व नागरिकांनी नगर परिषद कार्यालयातून ध्वज घेऊन जावे आणि सदर ध्वज आपल्या घरावरील उंच ठिकाणी १३ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत फडकविण्यात यावे.

नागभीड नगर परिषद येथे १३ऑगस्ट २०२३रोज रविवारला सकाळी ८.१५ वाजता नगर परिषद कार्यालयातील जेष्ठ कर्मचारी नंदा गोडे लिपिक यांचे हस्ते ध्वजरोहानाचा कार्यक्रम करण्यात आला आहे.

केंद्र शासनाचे उपक्रम मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश या अभियाना अंतर्गत विरो को वंदन म्हणून १४ऑगस्ट रोजी रोज सोमवारला मा श्री नानाजी रामाकृष्ण पाथोडे माझी सैनिक डोंगरगाव यांचे हस्ते ध्वजरोहानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

१५ ऑगस्ट २०२३ रोजी मंगळवारला मुख्य ध्वजरोहानाचा कार्यक्रम प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री राहुल कंकाळ यांचे हस्ते सकाळी ८.१५वाजता होणार असून नागरिकांनी ध्वजरोहन कार्यक्रमास उपस्थित राहावे असे एका पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये