ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सुखी जीवनासाठी निरामय आरोग्य महत्त्वाचे : वेकोली क्षेत्रीय प्रबंधक संजय मिश्रा

नायगाव (बु) येथे वेकोलीचे आरोग्य शिबिर ; 300 रुग्णांनी घेतला लाभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

मानवी जीवनात आरोग्याला अत्यंत महत्त्व असून सुदृढ आरोग्यामुळे माणूस जास्त काळ आपले सुखी जीवन जगू शकतो त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेत आपले जीवन उपभोगले पाहिजे असे प्रतिपादन निलजर्ई उपक्षेत्रीय प्रबंधक संजय मिश्रा यांनी केले. वेकोली वणी क्षेत्राच्या क्षेत्राच्या आदेशानुसार निलजर्ई उपक्षेत्रातर्फे नायगाव (बृ) येथे एका रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात ते बोलत होते.

या शिबिराचे उद्घाटन निलजर्ई उप क्षेत्रीय प्रबंधक संजय मिश्रा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी कार्मिक प्रबंधक विनोद पाटील, नेत्र तज्ञ डॉ. अमोल काटकर, डॉ. पराग पांडे, सरपंच गणेश मेश्राम, उपसरपंच आनंद बोबडे, सचिव माने आदी मान्यवर मंडळींची उपस्थिती होती.

या शिबिरात तीनशे रुग्णांनी सहभाग घेऊन आपल्या विविध रोगांवर उपचार करून घेतले. विशेष म्हणजे सध्या परिसरात डोळ्यांची साथ चालू आहे यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून त्यांना आवश्यक त्या औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्मीक प्रबंधक विनोद पाटील यांनी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेत वेळीच आलेल्या रोगावर उपचार करून आपले जीवन सुसह्य करण्याचे आवाहन केले. या शिबिराला घुगुस येतील राजू रतन केंद्रीय चिकित्सालय व सुंदर नगर येथील वैद्यकीय चमुने प्रत्यक्ष सहभाग घेऊन शिबिरातील रुग्णांवर उपचार करून त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन केले .या शिबिराचे संचालन व आभार विनोद पाटील यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये