सेवाग्राम पोलिसांची धडक कार्यवाही
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
उपरोक्त विषयान्वये सादर आहे की, दि 11/10/26 रोजी मुकबीर कडुन मिळालेल्या खबरे वरून मा. ‘ठाणेदार श्री देवेद्र ठाकुर पोलिस स्टेशन सेवाग्राम यांचे मार्गदर्शनात पोस्टॉप ग्रेड पो उप नि अजयकुमार येळणे, पो हवा. संदिप मेंढे/731. स. फौ. सतीष दरवरे / 582, पो.शि.अक्षय गुडापे/930, यांचे मदतीने सापळा रचुन दत्तपुर चौकात पवनार कडुन वर्षे कडे जानारे रोडवर नाकेबंदी केली असता यातील नमुद मारूती सुझुकी ब्रेझा कार कं MH-32-AH-3417 मध्ये आरोपी दिनेश अशोकराव येंडाळे वय 35 वर्ष रा नालवाडी वर्धा, हा मध्य प्रदेशातील उपलध्द असलेली विदेशीदारू कार मध्ये भरून नागपुर पवनार मार्गे वर्धा नेत असल्याचे माहीती वरून दत्तपुर चौक वर्षे कडे जानारे रोडवर नाकेबंदी केली असता नमुद कारमध्ये आरोपी इसम चालक सिटवर बसुन मिळुन आल्याने सदर कारची पंचासमक्ष पाहनी केलीअसता कारमध्ये 1) 23 खडर्याचे खोक्यात 180 एम.एल आफीसर चॉईस विदेशी दारूच्या 1104 शिश्या किं 2,76,000/रू 2) दोन खडर्याचे खोक्यात 180 एम्.एल आफीसर चॉईस ब्लु काचेच्या दारूच्या 96 शिश्या किं 28800/रू व मारूती सुझुकी ब्रेझा कार कं MH-32-AH-3417 किं 700000/रू असा कारसह एकुन जु किं 10,04,800/रू चा माल मिळुन आल्याने सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला
सदरची कार्यवाही मा. पोलिस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे, उप विभागिय पोलिस अधिकारी श्री सुनिल मंडलिक यांचे आदेशान्वये पोलिस स्टेशन सेवाग्राम चे ठाणेदार श्री देवेद्र ठाकुर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोस्टॉप ग्रेड पो उप नि अजयकुमार येळणे, पो.हवा. संदिप मेंढे/731. स. फौ. सतीष दरवरे / 582, पो.शि.अक्षय गुडापे/930. यांनी केलेली आहे.



