ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ॲड. अभिजित वंजारी यांचा १३ ऑक्टोबरला चंद्रपूर जिल्ह्यात दौरा

भद्रावती, राजुरा, गोंडपिपरी आणि चंद्रपूर येथे कार्यकर्ते व पदवीधर मतदारांशी साधणार संवाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार ॲड. अभिजित गोविंदराव वंजारी हे मंगळवार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कार्यकर्ते आणि पदवीधर मतदारांचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या माध्यमातून पदवीधर मतदारांशी संवाद साधण्यासह आगामी निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.

चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या दौऱ्याच्या कार्यक्रमानुसार, सकाळपासून सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील चार ठिकाणी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

दौऱ्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

सकाळी १०.३० वाजता — भद्रावती : स्वागत सेलिब्रेशन हॉल येथे भद्रावती तालुक्यातील कार्यकर्ते व पदवीधर मतदारांचा मेळावा होणार आहे.

दुपारी १२ वाजता — राजुरा : सुपर मार्केट येथे राजुरा, जिवती व कोरपना तालुक्यांतील कार्यकर्ते आणि पदवीधर मतदारांशी संवाद साधला जाणार आहे.

दुपारी २ वाजता — गोंडपिपरी : कला व वाणिज्य महाविद्यालय येथे गोंडपिपरी व पोंभुर्णा तालुक्यांतील कार्यकर्ते आणि पदवीधर मतदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

सायंकाळी ५ वाजता — चंद्रपूर : मातोश्री सभागृह, तुकूम रोड येथे चंद्रपूर शहर व तालुक्यातील कार्यकर्ते आणि पदवीधर मतदारांचा मेळावा होणार आहे.

या दौऱ्याच्या माध्यमातून पदवीधर मतदारसंघातील राजकीय घडामोडी, मतदारांशी संपर्क आणि संघटनात्मक नियोजनाला गती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून निवडणुकीच्या अनुषंगाने पुढील रणनीती निश्चित करण्याच्या दृष्टीने या बैठकांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

या कार्यक्रमांना सर्व महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, कर्मचारी तसेच पदवीधर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

*गोंडपिपरीतील मेळाव्याकडे विशेष लक्ष*

गोंडपिपरी आणि पोंभुर्णा तालुक्यांतील पदवीधर मतदार व कार्यकर्त्यांसाठी दुपारी २ वाजता गोंडपिपरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने स्थानिक पदाधिकारी आणि पदवीधर मतदारांना आपली भूमिका मांडण्याची संधी मिळणार असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणातही हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये