Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उच्चभ्रू वसाहतीत घाणीचे साम्राज्य, नगर परिषदेचे दुर्लक्ष!

रोगाची लागण होण्याची दाट शक्यता ; आफताप दुकानाला फटका

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
नागभीड नगर परिषद परिसरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सिद्दीविनायक वसाहतीत घाणीचे साम्राज्य पसरले असून याकडे नगर परिषद नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
नागपूर -ब्रम्हपुरी मार्ग सदर परिसरातून जात असल्याने नव्याने निर्माण झालेल्या वसाहतीत भूखंड धारकाने सोई सवलती उपलब्ध करून दिल्या नाही. यामुळे ग्रामपंचायत ते नगर परिषद कालावधीत या परिसराची अवस्था कायम राहिली तरीपण आजमितीला त्या ठिकाणी नगर परिषदेचे स्वच्छता गृह असून शहरातील घाण पाणी वाहून जाणारी, नाली आणि जनावरचे शेणखताचा डीगार ठेवण्याचे स्थान झाले असून याचा फटका वसाहतीला आणि जवळ असलेल्या आफताफ दुकानाला बसला असल्याचे दिसत आहे. स्वच्छता गृह आणि घाणीचे साम्राज्य असल्याने परिसरात रोगराई पसरन्यास वेळ लागणार नाही. वेळीच योग्य ती खबरदारी नगर परिषद प्रशासनाने घेतली नाही तर वसाहतीतील आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता नाकरता येत नाही.
 तसेच नालीतील पाणी बाहेर वाहून जात नसल्याने वसाहतीत असणाऱ्या विहिरी आणि कुप नलिका विहिरीना दूषित पाणी येत असल्याची तक्रार नगर परिषद प्रशासनाला केली असतानाही नगर परिषद या कडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भविष्यात येणाऱ्या निवडणुकीच्या वेळी पुढच्या वेळी पूर्ण करू असे आस्वासन दिले जाईल मात्र, आजमितीला उच्चभ्रू वसाहतीत घाणीचे साम्राज्य अशी वस्तुस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये