ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वुशु स्पर्धेत स्किल डेव्हलपमेंट अकॅडमीचा दबदबा! 

सात खेळाडूंनी पटकावले प्रथम क्रमांक ; विभागीय स्पर्धेसाठी निवड — जिल्हास्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 बुलडाणा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने, क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली १७ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या शालेय जिल्हास्तरीय वुशु क्रीडा स्पर्धेत स्किल डेव्हलपमेंट स्पोर्ट अकॅडमी, देऊळगाव राजा येथील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत आपला ठसा उमटवला.

या स्पर्धेत मैथिली तायडे, मयुरी थेटे, अरुण शिवरकर, मिलिंद शिवरकर, आरुष हटकर, राघव झोरे आणि निलेश शिवरकर यांनी आपल्या गटात प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्तरासाठी पात्रता मिळवली.

तर हरिओम रामाने, ओम झोरे, निळकंठ वारुळे आणि गौरव पाबळे यांनी द्वितीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.

अत्यंत चुरशीच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत अकॅडमीच्या खेळाडूंनी आक्रमकता, कौशल्य आणि आत्मविश्वासाचे प्रदर्शन करत पदकांवर आपले नाव कोरले. त्यांच्या या यशामुळे देऊळगाव राजा शहराच्या क्रीडा क्षेत्राची जिल्ह्यात पुन्हा एकदा दखल घेतली गेली आहे.

खेळाडूंच्या या यशाबद्दल पालक, शिक्षक व क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले. विभागीय स्तरावरही खेळाडू निश्चितच चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास प्रशिक्षक राजेश खांडेभराड यांनी व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये