ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपणा तालुक्यात जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे द्वारा काँग्रेसच्या संघटनात्मक आढावा बैठका. 

SIR व पदवीधर मतदार नोंदणीला गती देण्याचे आवाहन. 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना :_ तालुक्यातील मौजा अंतरगाव, नारंडा, माथा आणि कान्हाळगाव येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी विविध आढावा बैठका घेत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेत कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी, स्थानिक प्रश्न तसेच संघटनात्मक कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी SIR प्रक्रिया, पदवीधर मतदार नोंदणी आणि पक्षसंघटन बळकटीकरण या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदार नोंदणीच्या कामाला अधिक गती देतानाच प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या परिसरात सक्रियपणे काम करून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन सुभाषभाऊ धोटे यांनी केले. तळागाळातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवून नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

        या बैठकींना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, प्रा. आशिष देरकर, शैलेश लोखंडे, अभय मुनोत, सुरेश मालेकर, मुरलीधर बल्की, राहुल मालेकर, कल्पतरू कन्नाके, किसन मुसळे, किसन डोंगे, मंगेश वडसकर, प्रमोद पिंपळशेंडे, दिनकर काकडे, देवराव उलमाले, दिगांबर बावणे, आनंद नक्षीणे, विकास पिंपळशेंडे, बंडू सेलुरकर, पंकज वनकर, नानाजी उलमाले, मिलिंद ताकसांडे, हिराजी वांढरे, आशिष मोहुर्ले, प्रकाश मोहुर्ले, राजू ठाकरे, विनोद नवले, गणेश गोडे यांच्यासह स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये