ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शार्दुल आनंदराव अडबाले यांना पीएच.डी.पदवी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर : सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर चे अध्यक्ष आनंदराव अडबाले यांचे सुपुत्र शार्दुल अडबाले यांना गोंडवाना विद्यापीठाने नुकतीच आचार्य पदवी प्रदान केलेली आहे.

      शार्दुल अडबाले हे इंजिनियर असून त्यांनी राज्यशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केलेली आहे.त्यांच्या संशोधनाचा विषय “इंदिरा गांधी यांचे राजकीय नेतृत्व आणि बांगलादेशाच्या निर्मितीतील योगदान -एक चिकित्सक अध्ययन” असा असून त्यांनी ही पीएच.डी पदवी गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य तथा शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर चे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.संजय गोरे यांचे मार्गदर्शनाखाली पूर्ण केली आहे.त्यांनी राज्यशास्त्र विषयाचे घड्याळी तासिका सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य केलेले आहे.

    इंदिरा गांधी यांचे राजकीय नेतृत्व,त्यांच्या पंतप्रधानांच्या कार्यकाळातील त्यांची कार्य कुशलता तसेच बांगलादेशाच्या निर्मितीतील त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान या विषयावर शार्दुल अडबाले यांनी सविस्तर प्रबंध विद्यापीठाला सादर केलेला होता. त्यांच्या यशाबद्दल त्यांच्या मित्र परिवारातर्फे व शुभचिंतकांकडून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये