सेवाग्राम पोलिसांची जुगार अड्डावर धाड टाकून 11 लाख 5 हजारावर मुद्देमाल जप्त
देवेंद्र ठाकूर पोलीस निरीक्षक सेवाग्राम यांची धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि 09/09/26 रोजी मुकबीर कडुन मिळालेल्या खबरे वरून ठाणेदार श्री देवेद्र ठाकुर पोलिस स्टेशन सेवाग्राम यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टॉप पोलीस उपनिरिक्षक वाल्मीक बाबर्डे सहायक फौजदार सुनिल पाऊलझाडे सहायक फौजदार मारोती काटकर पोलीस हवालदार संदिप मेंढे पोलीस हवालदार संजय लाडे नायक पोलीस शिपाई स्वप्नील नायक पोलिस शिपाई धिरज चालक पोलीस हवालदार विलास लोहकरे पोलीस शिपाई निलेश यांचे मदतीने सापळा रचुन एम आय डि सि सेवाग्राम परीसरातील अक्षय बुरांडे याचे सिमेंट विटा बनविन्याचे कंपनीतील खाली जागेत मोकळया टिनाचे शेड खाली काही इसम 52 ताश पत्याचा पैशाची हारजितचा जुगार खेळ खेळत आहे. अश्या माहीती वरून पंचासमक्ष नमुद ठिकाणी जुगार रेड केला असता मौक्यावर सहा इसमाचे ताब्यात घेतले 52 तास पत्ते व डावावर नगदी 13000/रूपये दोन टेबल फॅन किंमत 5000/रूपये 09 प्लॉस्टीक खुच्या किं 4500/रुपये 03 प्लॉस्टीक टेबल किं 3000/रूपये तसेच आरोपी क्रमांक (1) गजानन मनोहर गिरडकर वय 38 वर्ष रा बोरगाव मेघे वर्षा आरोपी क्रमांक (2) हेमंत देवचंद सावरकर वय 36 वर्ष रा बोरगाव मेघे आरोपी क्रमांक (3)भुषण अर्जुनराव वैदय वय 34 वर्ष रा बोरगाव मेघेआरोपी क्रमांक ( 4 )अब्दुल रजा अब्दुल रउफ वय 38 वर्ष रा आनंद नगर वर्धा आरोपी क्रमांक ( 5 )अयान रहीम शेख वय 24 वर्ष रा आर्वी नाका वर्धा आरोपी क्रमांक (6) समीर रूस्तम सयद वय 40 वर्ष रा सोनेगाव स्टेशन हल्ली मुक्काम सिध्दार्थ नगर बोरगाव मेघे यांचे ताब्यातुन व अंगडतीत तसेच मोक्यावरून मोटर सायकल व कार व मोबाईल सह जु किं 11,05,550/रू चा माल मिळुन आल्याने सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे वर्धा उपविभागिय पोलिस अधिकारी श्री सुनिल महाडिक वर्धा यांच्या आदेशान्वये पोलिस स्टेशन सेवाग्राम चे ठाणेदार श्री देवेद्र ठाकुर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टॉप पोलीस उपनिरिक्षक वाल्मीक बाबर्डे सहायक फौजदार सुनिल पाउलझाडे, सहायक फौजदार मारोती काटकर पोलीस हवालदार संदिप मेंढे पोलीस हवालदार संजय लाडे नायक पोलीस शिपाई स्वप्नील नायक पोलिस शिपाई धिरज चालक पोलीस हवालदार विलास लोहकरे पोलीस शिपाई निलेश यांनी केलेली आहे.



